घरठाणेमांजरीच्या हत्येप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मांजरीच्या हत्येप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Subscribe

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील एका रहिवाशी इमारतीच्या आवारात काळ्या रंगाच्या मांजरीचा मृतदेह मिळून आला असून या मांजरीची हत्या करण्यात आल्याची तक्रार एका महिलेने पोलीस ठाण्यात केली आहे.

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील एका रहिवाशी इमारतीच्या आवारात काळ्या रंगाच्या मांजरीचा मृतदेह मिळून आला असून या मांजरीची हत्या करण्यात आल्याची तक्रार एका महिलेने पोलीस ठाण्यात केली आहे. याप्रकरणी चितळसर पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध मांजरीची हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील हिलगार्डन सोसायटीच्या आवारात शनिवारी सकाळी एका काळ्या रंगाची मांजर मृत अवस्थेत पडली असल्याचे परिसरात राहणाऱ्या पूजा जोशी दिसून आले. त्यांनी जवळ जाऊन बघितले असता पूजा जोशी यांनी आदल्याच दिवशी रात्री मृत मांजरीला जेवण भरवले होते, त्यावेळी हि मांजर व्यवस्थित होती. रात्रीतून अचानक काय झाले म्हणून त्यांनी आजूबाजूला चौकशी केली मात्र याबाबत कुणालाही काही माहित नव्हते. मांजरीची हत्या करण्यात आली असल्याच्या संशयावरून पूजा जोशी यांनी चितळसर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली.

- Advertisement -

मी राहत असलेल्या सोसायटी मधील मांजराना मी आणि माझी मैत्रीण जया आम्ही दोघी मागील तीन वर्षापासुन जेवण देत असतो,आम्ही मांजराना खायला देतो हे सोसायटीतील काही लोकांना आवडत नसल्यमुळे ते आम्हाला त्रास देतात. गेल्या महिन्यात आमचे सोसायटीतील अचानक ८ मांजराचा मृत्यू झाला असून आम्ही याकडे दुर्लक्ष करून सोसायटीत असलेल्या काळ्या रंगाच्या मांजराला जेवण देत होते. नेहमी प्रमाणे शुक्रवारी रात्री आम्ही काळी मांजराला जेवण भरवले तेव्हा ते मांजर खेळत होते, दुसऱ्या दिवशी सकाळी हे मांजर मृत अवस्थेत मिळून आले, या मांजराची कोणीतरी हत्या केली असावी असा आरोप पूजा जोशी यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. चितळसर पोलिसांनी या तक्रारीवरून मांजरीच्या हत्येप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.


चित्रपटांकडे वेगळ्या दृष्टीने पाहणारा दिग्दर्शक, लेखक ‘निशिकांत कामत’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -