स्काय गार्डन सोसायटीच्या लीलियम इमारतीच्या १३ व्या मजल्यावर डक्टमध्ये आग

A fire broke out in a duct on the 13th floor of the Sky Garden Society's Lilium building
A fire broke out in a duct on the 13th floor of the Sky Garden Society's Lilium building

ठाणे – घोडबंदर रोड, कासरवडवली येथील एका इमारतीच्या 13 व्या मजल्यापासून 17 मजल्यापर्यंत डक्टमधल्या इलेक्ट्रिक केबलला, टाकाऊ लाकडी वस्तू व कचऱ्याला आग लागली. ही घटना मंगळावरी सकाळी सव्वाआठच्या सुमारास समोर आली. या घटनेनंतर इमारतीमध्ये अडकलेल्या ७० ते ७५ जणांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याची माहिती आपत्ती व्यावस्थापन विभागाने दिली आहे.

घोडबंदर रोड, आनंदनगर, कासारवडवली येथे सुदर्शन स्काय गार्डन सोसायटीच्या लीलियम इमारत या तळ अधिक १७ मजली इमारतीच्या १३-व्या मजल्यापासू १७-व्या मजल्यापर्यंत डक्टमध्ये असलेल्या इलेक्ट्रिक केबलला, टाकावू लाकडी वस्तू व कचऱ्याला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेतली. या घटनास्थळी आगीमुळे धूर पसरला होता. इमारतीत १३ ते १७ मजल्यावर राहणारे ७० ते ७५ रहिवाशी अडकले होते. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने त्यांना बाहेर काढून त्यांची सुटका केली.

या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले. याघटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. घटनास्थळी एक फायर वाहन आणि १- रेस्क्यू वाहन पाचारण करण्यात आले होते, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.