घरठाणेशिवजयंतीनिमित्त डोंबिवलीत भव्य बाईक रॅली

शिवजयंतीनिमित्त डोंबिवलीत भव्य बाईक रॅली

Subscribe

 मराठा हितवर्धक मंडळाच्या वतीने यंदा प्रथमच शिवजयंती निमित्त १९ फेब्रुवारी रोजी डोंबिवली शहरात भव्य बाईक रॅली काढण्यात येणार आहे. आपल्या राजांची जयंती तितक्याच उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. हा उत्सव घराघरांत साजरा व्हावा, शिवजयंतीचे महत्व भावी पिढीला कळावे व युवा पिढीने तरुणाईने या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे या हेतूने हि बाईक रॅली  काढण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या  घरावर व गाडीवर किमान शिवजयंती दिवशी भगवा झेंडा लावावा. घराबाहेर रांगोळी काढावी असे आवाहन मराठा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

१९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता डोंबिवली पश्चिमेतील मराठा मंदिर येथून भव्य बाईक रॅलीला सुरुवात होणार आहे. रॅली महात्मा फुले रोड दोन पाण्याची टाकी, उमेश नगर नाका, रेती बंदर रोड चौक, सम्राट चौक, दीनदयाळ रोड, द्वारका हॉटेल, जोंधळे चौक, कोपर पुल, टंडन रोड, ठाकूर हॉल, ईश्वर हॉस्पिटल, शिव मंदिर चौक, चार रस्ता, पारसमनी चौक, टिळक पुतळा, ताई पिंगळे चौक, सर्वेश हॉल, मदन ठाकरे चौक, फडके रोड, बाजी प्रभू देशपांडे चौक, इंदिरा गांधी चौक मार्गे  छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे पोहोचेल .तेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून हि रॅली विसर्जित होईल.

- Advertisement -

या बाईक रॅलीत पुढे बुलेट स्वार असतील त्यामागे महिला बाईक स्वार, त्यामागे बाल शिवाजी, राजमाता जिजाऊ व मावळे असा चित्ररथ असेल. त्यामागे मंडळाचे आजी माजी सर्व पदाधिकारी व त्यामागे इतर बाईक स्वार असतील. सर्व महिला – पुरुषांनी  पारंपारिक वेशभूषा करून या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मराठा मंडळाचे सेक्रेटरी विजय राऊत यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -