घरठाणेअर्धवट जळालेला मृतदेह आढळला

अर्धवट जळालेला मृतदेह आढळला

Subscribe

कल्याण पूर्वेतील पत्री पूल जवळ रेल्वे रुळालगत अर्धवट जळालेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला. या व्यक्तीची हत्या करून जाळून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याच्या संशय व्यक्त करण्यात येत आहे. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही, या प्रकरणाचा तपास डोंबिवलीतील टिळक नगर पोलीस करीत आहेत. कल्याण पूर्वेतील पत्री पूल जवळ असलेल्या अशोक सिंघल उद्यानाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या रेल्वे ट्रॅक परिसरात रेल्वे पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू होते. त्यावेळी रुळालगत असलेल्या झुडपात काहीतरी जळत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संशय आल्याने त्यांनी झुडपात जाऊन पाहिले असता एक मृतदेह अर्धवट जळालेला अवस्थेत आढळून आला.

याबाबतची माहिती रेल्वे पोलिसांनी टिळक नगर पोलिसांना दिली. टिळक नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हा मृतदेह ताब्यात घेत मृतदेह पोस्टमार्टमसाठी नेला आहे. अंदाजे 35 ते 40 वर्षाच्या इसमाचा मृतदेह असून त्याची ओळख पटलेली नाही. या व्यक्तीची हत्या करून जाळण्यात आले कि जाळून त्याची हत्या करण्यात आली? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. संबंधित व्यक्ती आसपासच्या परिसरातील असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. याप्रकरणी टिळक नगर पोलीस पुढील तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -