अंबरनाथ फेस्टिवलमध्ये चेंगराचेंगरी

 15 जखमी

अंबरनाथ येथे शिवमंदिर कला फेस्टिवलमध्ये रविवारी प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या कार्यक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी तुफान गर्दी झाली होती. या गर्दीत गोंधळ निर्माण झाल्याने चेंगराचेंगरी झाली यात जवळपास 15 जण जबर जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. दुपारी 4 वाजल्यापासून याठिकाणी मोठी गर्दी वाढली होती. ही गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने जमावाला नियंत्रित करताना प्रवेशद्वारावर पळापळ सुरू झाली. यात झालेल्या चेंगराचेंगरीत १५ जण जखमी झाले. त्यांना पोलिसांनी ताबडतोब छाया हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तर काहींना उपचार करून घरी सोडण्यात आले. तसेच, काहींना उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.