घरठाणेकचरा मुक्तीच्या दिशेने पाऊल

कचरा मुक्तीच्या दिशेने पाऊल

Subscribe

महापालिका करणार कचरा व्यवस्थापन

 सद्यस्थितीत ठाणे महानगरपालिका हद्दीत प्लास्टीक कचरा व्यवस्थापनासाठी ९ सुका कचरा संकलन केंद्रे प्रभाग समिती  निहाय उपलब्ध आहेत. परंतु कळवा, मुंब्रा व दिवा प्रभाग समितीत प्लास्टीक संकलन केंद्र तयार आहेत. परंतु, रोजचा कचरा व्यवस्थापनाकरिता संस्थांची नेमणूक अद्यापी केलेली नाही. तरी त्या प्रभागांमध्ये जनजागृती करुन सुका कचरा व्यवस्थापनाच्या कामाचे परिचलनासाठी संस्थाची नेमणूक करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे.
 ठाणे महापालिका हद्दीत ९ प्रभाग समिती हद्दीत प्लास्टीक कचरा व्यवस्थापनासाठी सुका कचरा संकलन केंद्र उभारण्यात आली आहेत. याची क्षमता प्रति दिन १ ते २ टन या प्रमाणे आहे. ठामपातील वर्तकनगर, माजिवडा, उथळसर प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील सुक कचरा संकलन करणे त्याचे नियमानुसार व्यवस्थापन करण्याकरिता संस्थेची नियुक्ती करण्यात आलेली आहे. लोकमान्यनगर, वागळे इस्टेट व रायलादेवी प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील सुका कचर संकलन करून त्यांचे नियमानुसार व्यवस्थापन करण्याकरिता संस्थेची नियुक्ती झाली असून या दोनही संस्थाच्या माध्यमातून ६ सुका कचरा संकलन केंद्राचे नियमतिपणे काम होत आहे.
तसेच कळवा, मुंबा व दिवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रसाठी प्लास्टीक संकलन केंद्र तयार आहेत. परंतु, दैनदिन कचर व्यवस्थापनाकरिता संस्थांची नेमणूक अद्याप करण्यात आलेली नाही. तरी त्या प्रभागांमध्ये जनजागृती करुन सुका कचर व्यवस्थापनाच्या कामाचे परिचलनासाठी संस्थाची नेमणूक करणे आवश्यक असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यासाठी निविदा मागवून संस्थांची नियुक्ती केल्यास ठामपावर कोणताही आर्थिक भार येणार नाही. तसेच २ ते ५ टन प्रतिदिन प्लास्टीक कचऱ्याचे व्यवस्थापन होईल. असा दावा पालिकेने केला आहे. त्या अनुषंगाने महापालिका १ हजार ते ३ हजार चौ. फुट जागा शेडसह उपलब्ध करु न देईल तसेच ३ फेज विद्युत जोडणी पाणी जोडणी देणार आहे. त्यानुसार हे काम करु इच्छिणाऱ्या संस्थांनी पालिकेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
याशिवाय संबंधीत संस्थेने मशीनरी उभारणी करणे व निगा व देखभाल करणे.ठामपा क्षेत्रातील सामाजिक संस्थांशी समन्वय साधून प्लास्टीक कचरा संकलन करणे कचरा वेचकांची नेमणूक करु न त्यांना प्रशिक्षण देणे, कर्मचाऱ्यांचा पगार देणे, सुरक्षा साधने पुरविणे आदी कामे करावी लागणार आहे. तसेच रोजच्या रोज प्राप्त होणाऱ्या सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करुन पुनचक्रीकरण करणे तसेच  कामाचा अहवाल व नियमितपणे विद्युत देयके, पाणी देयके अदा करावी लागणार आहेत.

या कामात महापालिकेच्या खांद्यावर कोणताही आर्थिक भार येणार नसल्याने कळवा, मुंब्रा आणि दिवा येथील प्लास्टीक कचरा व्यवस्थापनाकरीता करणे. ठामपावर कोणताही आर्थिक भार येणार नसल्याने, ठामपातील कळवा, मुंब्रा, दिवा येथील प्लास्टीक कचरा व्यवस्थापनाकरिता १० वर्ष कालावधीकरिता प्रकल्प राबविण्या संदर्भातील हा प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -