घरठाणेठाण्यात झाड पडून एक जण जखमी तर चार दुचाकींचे नुकसान

ठाण्यात झाड पडून एक जण जखमी तर चार दुचाकींचे नुकसान

Subscribe

त्याच ठिकाणी झाड पडल्यामुळे चार दुचाकींचे मात्र नुकसान झाले आहे. ही घटना शनिवारी सकाळी 10:15 च्या सुमारास घडली.

ठाणे: आज शनिवारी सकाळी ठाण्यातील(thane) कळवा येथे एक हॉस्पिटल जवळ मोठे झाड पडल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका व्यक्तीला मार लागला आहे तर काही वाहनांचं सुद्धा नुकसान झालं आहे. पण सुदैवाने मात्र यात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.

हे ही वाचा – दर्याराजा शांत हो.. कोळी-मच्छीमार बांधवांना धंद्यात यश दे!; ठाण्यात नारळीपौर्णिमा उत्साहात

- Advertisement -

ठाण्यातील कळवा(kalwa) येथे छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलच्या(chhatrapati shivaji maharaj hospital) आवारात एक झाड पडले. झाड पडल्यामुळे कळवा येथी राहणारे रहिवासी राज नारायण दुबे वय वर्षे 52 हे जखमी झाले आहेत तर या घटनेत त्यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. त्याचबरोबर जिथे झाड पडले तिथे काही दुचारी पार्क केल्या होत्या. त्याच ठिकाणी झाड पडल्यामुळे चार दुचाकींचे मात्र नुकसान झाले आहे. ही घटना शनिवारी सकाळी 10:15 च्या सुमारास घडली.

 

- Advertisement -

हे ही वाचा – स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित; 14 ऑगस्टला ठाणे महापालिकेची मॅरेथॉन स्पर्धा

कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलच्या(chhatrapati shivaji maharaj hospital)  आवारात पार्क केलेल्या दुचाकींवर झाड पडले त्यात दुचाकींच्या नुकसानासह असून एक जण जखमी झाल्याची माहिती दत्तात्रय कोल्हे या व्यक्तीने आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली आहे. या घटनेची माहिती मिळत घटनास्थळी वृक्ष प्राधिकरण विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष व अग्निशमन दल त्वरित दाखल झाले. या घटनेत 52 वर्षीय नारायण दुबे हे जखमी झाल्याचे समोर आले त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. तसेच उपचार करून त्यांना घरी सुद्धा सोडण्यात आले आहे. तसेच पडलेल्या झाडामुळे चार वाहनांचे नुकसान झाले असून पडलेले झाड बाजूला करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे.

हे ही वाचा – ठाण्यात दहीहंडी उत्सवासाठी लाखोंची बक्षिसे, गोविंदा मंडळांमध्ये मोठी चुरस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -