टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंदिरानगर येथे भरणाऱ्या बुधवार आठवडी बाजाराच्या गर्दीमुळे रस्त्यावरून जाणाऱ्या बस खाली दोन वर्षीय स्वरूप चेतन भगत या मुलाचा गाडीच्या चाकाखाली आल्याने डोके चिरडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. पोलिसांनी गाडी चालक योगेश चौरे (34) याला अटक केली आहे. सावरकर येथील सिद्धिविनायक कॉलोनी येथील राहणारा स्वरूप हा आपली आई सिता भगत हिच्यासोबत आठवडी बाजारात गेला होता. आई बाजारात खरेदी करीत होती. खरेदी करून ती निघत असताना सदरील मुलाचा या बसखाली आल्याने मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान बुधवारी सुरू असणाऱ्या या अनधिकृत आठवडे बाजारामुळे इंदिरानगरकडे जाणारा एकतर्फी रस्ता बंद केला जात असल्याने जाणारी व येणारी वाहतूक ही एकाच रस्त्याने होत असल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. टिटवाळा पोलिसांनी मृत स्वरूप याचा मृतदेह रुख्मिनी बाई इस्पितळात दाखल केला असून याबाबत टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कारामुगे हे करीत आहेत.