बाप, मुलीची आत्महत्या

मरणापूर्वी लिहिलेल्या चिट्ठीच्या अनुषंगाने शहापूर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली

another kolkata model found dead fourth in 2 weeks marathi
कोलकत्यात आणखी एक मॉडेलची गळफास घेत आत्महत्या; दोन आठवड्यात चौथ्या मॉडेलचा मृत्यू

पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा केला नसताना आई ला व स्वतःला जेल मध्ये जावे लागल्याने नैराश्य आलेल्या बापाने व अकरा वर्षीय मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील आसनगाव येथे घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून बापाने मरणापूर्वी लिहिलेल्या चिट्ठीच्या अनुषंगाने शहापूर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

आसनगाव येथील विकास केदारे याने आपली अकरा वर्षाची मुलगी आर्या सह आत्महत्या केली असून याबाबत शहापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी विकासची पत्नी मोनालीने केलेल्या आत्महत्या प्रकरणी विकास व त्याच्या आईवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आपण काही गुन्हा केलेला नसताना विकास आणि त्याची वयोवृद्ध आई या दोघांनाही या प्रकरणात शिक्षा झाल्याचा आरोप मृत विकास ने चिठ्ठीमध्ये व्यक्त केला आहे.तसेच चिठ्ठीमध्ये शहापूर पोलीस ठाण्यातील तपास अधिकाऱ्यावरही बोट ठेवलं असून माझ्यासोबत विश्वासघात झाला आहे पण आता सहन होत नाही. मी बरबाद झालोय, न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगली, स्वतःचा अति प्रामाणिकपणा नडला असल्याचे सांगत माझ्या मुलीला डॉक्टर बनवायचे माझे स्वप्न होते आर्याकडे पाहून उभं राहण्याचा प्रयत्न केला पण असह्य होत आहे. आर्या आणि मी स्वतःच्या मर्जीने आमचं जीवन संपवित असल्याचे आत्महत्यापूर्वी विकासने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. या चिठ्ठीच्या अनुषंगाने तपास सुरू करणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनी सांगितले.