घरक्राइमचार महिन्यात सुमारे 1 कोटी 62 लाखांचे अंमली पदार्थ जप्त

चार महिन्यात सुमारे 1 कोटी 62 लाखांचे अंमली पदार्थ जप्त

Subscribe

ठाणे शहर अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने जानेवारी 2023 पासून आतापर्यंत 165 जणांविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत 131 गुन्हे दाखल केले तसेच त्यांच्याकडून एक कोटी 62 लाख 42 हजार 635 रुपये किमतीचा माल जप्त केला आहे. यामध्ये गांजा,चरस, कोकेन, एडी आणि कॅप सिरप याचा समावेश आहे.
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात जिल्हास्तरीय अमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक नुकतीच अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ठाणे शहर पोलीस उप आयुक्त (गुन्हे) शिवराज पाटील, ठाणे शहर (गुन्हे) इंद्रजीत कार्ले, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नंदकिशोर मोरे, अन्न व औषध विभागाचे सहा. आयुक्त, रा. प. चौधरी, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय शिंदे, सहा. पो. निरीक्षक निलेश मोरे आदी उपस्थित होते.

अमंली पदार्थ विरोधी पथकाच्या वतीने आयुक्तालयाच्या हद्दीत अंमली पदार्थांचा वापर, विक्री, वाहतूक रोखण्यासाठी केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्यात आला. जानेवारी 2023 ते आतापर्यंत 14 प्रकरणात 21 जणांना अटक करून त्यांच्याकडून 385 किलो 986 ग्रॅम वजनाचा गांजा, 6 जणांकडून 1 किलो 775 ग्रॅम वजनाचा चरस, 3 जणांकडून 147 ग्रॅम कोकेन, 9 प्रकरणात 15 जणांकडून 646 ग्रॅम 66 मि.ग्रॅ. मेफेड्रॉन( एमडी), एलएसडी चे 15 नगडॉट, 4 जणांकडून कफ सिरपच्या सहा हजार बाटल्या जप्त करण्यात आले असून अमंली पदार्थ सेवन करणार्‍या 116 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली. ठाणे शहर आयुक्तालय कार्यक्षेत्रातील व्यसनमुक्ती केंद्रांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने प्रत्येक महिन्यात तीन वेळा भेट द्यावी. तेथे दाखल असलेल्या व्यक्तींबाबत माहिती घेवून त्यांची यादी बनवावी. तसेच त्यांच्याकडून अंमली पदार्थ विक्रीबाबत, पुरवठ्याबाबत गोपनीय माहिती घ्यावी. तसेच व्यसनमुक्ती केंद्रांच्या अडचणीबाबत चर्चा करावी.कृषी विभागाशी समन्वय साधून खसखस व गांजाच्या लागवडी संदर्भात माहिती घेवून कारवाई करावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -