ठाण्यात दुर्घटनांचे सत्र सुरुच: दरड कोसळण्याच्या घटनेनंतर आता ब्रिजचे प्लास्टर पडले

Accident season continues in Thane landslide near Mumbra bypass bridge plaster fell

ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. ठाण्यातील अनेक भागात पावसाची संततधार सुरुच आहे. या पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटनांचे सत्र सुरु आहे तर दुसरीकडे आता मुंब्रा बायपासला जोडणाऱ्या ब्रिजचे प्लास्टर पडल्याची घटना समोर आली आहे.

दुसऱ्या दिवशी मुंब्रा बायपासवर दरड कोसळली

मुंब्रा बायपास रोडवर दुसऱ्या दिवशी पुन्हा दरड कोसळल्याची घटना बुधवारी दुपारी १ वाजून ८ मिनिटांच्या सुमारास समोर आली. रोडवरती कोसळली दरड बाजूला करण्यात आली आहे. मुंब्रा बायपास रोडच्या पनवेल कडून ठाणेकडे येणारी वाहिनीवरील खडी मशिन रोड जवळ दरड कोसळली. अशी माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी १-जे.सी.बी. मशिनसह, अग्निशमन दलाचे जवान १-रेस्क्यू वाहन आणि १-इमर्जन्सी वाहनासह दाखल झाले . सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नसून रोडवरती मातीचा आलेला मलबा तातडीने बाजूला करण्याचे काम हाती घेण्यात आले.तो रस्ता मोकळा करण्यात आला अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

मुंब्रा बायपासला जोडणारा ब्रिजचे प्लास्टर पडले

मुंब्रा बायपासला जोडणारा ब्रिजचा प्लास्टरचा काही भाग पडल्याची घटना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. मुंब्रा,पारसिक रेतीबंदर येथील मुंब्रा बायपासला जोडणारा ब्रिजचा प्लास्टरचा काही भाग पडल्याची माहिती पुढे येताच, घटनास्थळी मुंब्रा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त व अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. तसेच संबंधित विभागाला याबाबत माहिती देत, लवकरात लवकर कार्यवाही करा असे सांगितले. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.


राज्यात दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा; राष्ट्रीय, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १५ तुकड्या तैनात