घरठाणेचिमुरडीवर अत्याचार; आरोपीला दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा

चिमुरडीवर अत्याचार; आरोपीला दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा

Subscribe

ठाणे विशेष पोस्को न्यायालयाचा निकाल

पाच वर्षीय चिमुरडीला पायी चालत जात असताना उचलून घरात घेत, तिच्यावर लैंगिक अत्याचार करणार्‍या चंद्रशेखर महादेव केणी उर्फ पांडू काका (४९) या आरोपीला बुधवारी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष पोस्को न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी दोषी ठरवून दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली, अशी माहिती सरकारी वकील संजय मोरे यांनी दिली. तसेच ही घटना २०१८ साली वागळे इस्टेट येथील केणी नगरमध्ये घडली होती.

पीडित मुलगी १२ फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी शाळेतून घरी आल्यानंतर १५ मिनिटांनी तिच्या मैत्रिणीकडे गेली होती. तेथून परत तिच्या घरी जाताना आरोपी पांडू काका याने तिला उचलून आपल्या घरी घेतले. तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार पीडित मुलीने तिच्या आईला सांगितला. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर आरोपीला तात्काळ १३ फेब्रुवारी २०१८ रोजी अटक केली. या घटनेच्या तीन वर्षांपूर्वी ही आरोपीने त्याच परिसरातील आणखी एका मुलीसोबत असा प्रकार केल्याची बाब पुढे आली.

- Advertisement -

या प्रकरणीचा तपास पूर्ण झाल्यावर वागळे इस्टेस्ट पोलिसांनी आरोपीविरोधात दोषारोपपत्र दाखल केला. त्यानंतर हा खटला न्यायाधीश के. डी. शिरभाते यांच्या न्यायालयासमोर आल्यावर सरकारी वकील मोरे यांनी तपासलेल्या दहा साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून आरोपीला दोषी ठरविण्यात आले. तसेच दहा वर्षांची सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली असून दंड न भरल्यास दोन महिने साधी कैदेची शिक्षा सुनावली. त्याचबरोबर आणखी एका कलमान्वये एक वर्षाची साधी कैद सुनावली आहे. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे महिला पोलीस उपनिरीक्षक एस.डी.गवते यांनी तपास केला तर न्यायालयीन पेहरवी हेडकॉन्स्टेबल वाघ यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -