वर्तकनगरमधील बेकायदेशीर व अनधिकृत दुकानांवर कारवाई

झुणका भाकर उपक्रम शासनाने बंद केला असून समिधा मोहिते यांनी तो चालू ठेवला व त्यात गुटका, सिगारेट तसेच चायनीज पदार्थ विक्रीस ठेवल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, व त्यात तथ्य असल्याने कारवाई करण्यात आली असून माजिवडा प्रभाग समिती मधील हिरानंदानी इस्टेट येथील रिक्की वाईन व माटो माटो या बारच्या ओपन स्पेसमध्ये वाणिज्य दारूविक्री व हुक्का पिण्यासाठी वापर केल्यावरून कृष्णनी व श्रध्देश सुरेश मोहिते यांच्या बारवर कारवाई करण्यात आली.

tmc building
ठाणे महानगर पालिका

ठाणे महापालिका क्षेत्रात महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या आदेशाने अतिक्रमण कारवाई सुरु आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अतिक्रमण (मुख्यालय) विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या विशेष पथकाने रविवारी वर्तकनगर समितीमधील उपवन येथील समिधा सुरेश मोहिते यांचे झुणका भाकर केंद्र सिल करून ताब्यात घेतले. (Action against illegal and unauthorized shops in Vartak Nagar)

झुणका भाकर उपक्रम शासनाने बंद केला असून समिधा मोहिते यांनी तो चालू ठेवला व त्यात गुटका, सिगारेट तसेच चायनीज पदार्थ विक्रीस ठेवल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, व त्यात तथ्य असल्याने कारवाई करण्यात आली असून माजिवडा प्रभाग समिती मधील हिरानंदानी इस्टेट येथील रिक्की वाईन व माटो माटो या बारच्या ओपन स्पेसमध्ये वाणिज्य दारूविक्री व हुक्का पिण्यासाठी वापर केल्यावरून कृष्णनी व श्रध्देश सुरेश मोहिते यांच्या बारवर कारवाई करण्यात आली. तसेच उपवन येथील बॉम्बे डक बारची अनधिकृत शेड तोडण्यात आली, सदरचे हॉटेल प्रीतम प्रेमसिंग रजपूत व संतोष प्रेमसिंग रजपूत यांचे आहे.

सदरची कारवाई आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या आदेशाने उपायुक्त गोदेपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या विशेष पथका मार्फत करण्यात आली आहे. तसेच, अनधिकृत बांधकाम प्रकरणी सोमवारी समिधा सुरेश मोहिते, कृष्णानी व श्रध्देश सुरेश मोहिते, प्रीतम प्रेमसिंग रजपूत, संतोष प्रेमसिंग रजपूत यांच्यावर MRTP अन्वये गुन्हे दाखल होणार आहेत.

या कारवाईमध्ये माजिवडा व वर्तक समितीचे अधिकारी व कर्मचारी व पोलीस उपस्थित होते. यापुढे शहरातील जे झुणका भाकर केंद्र सुरू आहेत त्यांच्यावर व अनधिकृत बांधकामावर कारवाया सुरूच राहणार असल्याचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी स्पष्ट केले आहे.

समिधा मोहिते यांची नुकतीच शिवसेनेच्या ठाणे जिल्हा महिला संघटकपदी नियुक्ती झालेली आहे. त्या गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत आहे. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे चौदावे वंशज सुरेश मोहिते यांच्या त्या पत्नी आहेत.


हेही वाचा – उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधकांकडून मार्गारेट अल्वांना उमेदवारी