घरठाणेएकाच आठवड्यात १७ अनधिकृत बांधकामांवर कारवाई

एकाच आठवड्यात १७ अनधिकृत बांधकामांवर कारवाई

Subscribe

केडीएमसीचा धडाका सुरूच

कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पालिका क्षेत्रातील सुमारे दोन हजार अनधिकृत बांधकामे तीन महिन्यात जमिनदोस्त करण्याचे जाहीर केले होते, परंतु पूर्वीच्याच अनधिकृत बांधकामांच्या संख्येत प्रती दिन निर्माण होणाऱ्या नवीन अनधिकृत बांधकामांचीही भर पडत आहे, असे असतानाही पालिकेच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने गेल्या आठवड्यात १७ अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवून ही बांधकामे जमिनदोस्त केली आहेत. या अनधिकृत बांधकामात कल्याण पूर्वेतील एक वादातीत ढाबाही जमिनदोस्त केला आहे. याच आठवड्यात एकूण १६३ अतिक्रमणे आढळून आली असून ती सर्वच्या सर्व जमिनदोस्त करण्यात आली आहेत.

तीन जानेवारी ते ९ जानेवारी २०२२ या दरम्यानच्या आठवड्यात सर्वाधीक ७ अनधिकृत बांधकामे ही प्रभाग १० इ मध्ये आढळून आली. तर त्या खालोखाल प्रभाग ४ जे मध्ये ४ अनधिकृत बांधकामे आढळून आल्याचे पालिकेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत दिसून येते. प्रभाग ४ जे मधील कारवाई करण्यात आलेल्या ४ अनधिकृत बांधकामांपैकी दोन धार्मिक स्थळांच्या मार्गात असलेल्या एका ढाब्याचाही समावेश आहे. या ढाब्यावरील कारवाईनंतर याच मार्गात पर्यायी नवीन ढाबा निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

अन्य प्रभागांपैकी ९ प्रभाग आय आणि प्रभाग ५ ड मध्ये प्रत्येकी २ तर प्रभाग ब, फ, ह, ग या प्रभागांत प्रत्येक १ अनधिकृत बांधकाम आढळून आले. या सर्वच्या सर्व १७ अनधिकृत बांधमांसह अन्य २ अशी एकूण १९ अनधिकृत बांधकामे जमिनदोस्त करण्यात आली आहेत. याच बरोबर गेल्या आठवड्यात फेरीवाला पथकांकडून रुपये ३४३५० रुपये इतकी रक्कम दंड स्वरूपात वसूल करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -