घरठाणेमामा-भांजे डोंगरावरील ‘लँड जिहाद’ विरोधात होणार कारवाई

मामा-भांजे डोंगरावरील ‘लँड जिहाद’ विरोधात होणार कारवाई

Subscribe

ठाणे पोलिसांची मनसेला लेखी हमी

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने ( मनविसे) ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊरमधील मामा – भांजे डोंगरावरील ’लँड जिहाद’ उघडकीस आणला असून त्या विरोधात लढा सुरू केला आहे. दोन दिवसांपूर्वी अनधिकृत धर्मस्थळापेक्षा देशाची सुरक्षा महत्वाची असल्याने प्रशासनाने हे अतिक्रमण तत्काळ हटवावे, अन्यथा, दर्ग्याशेजारीच शंकराचे मंदिर उभारण्याचा इशारा मनविसेचे राज्य सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक व वनसंरक्षक यांना लेखी निवेदना द्वारे दिला होता. याची दखल घेत दोन्ही दर्ग्या आजूबाजूला असलेले अनधिकृत बांधकाम हटविण्याबाबत शासकीय पातळीवर कार्यवाही करण्यात येणार असल्याची पोलिसांनी पत्राद्वारे हमी दिली आहे. तसेच हे अतिक्रमण वन विभागाच्या जागेवर असल्याने अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी वन विभाग आणि ठाणे महानगरपालिकेची असून संबंधीत विभागाला पोलिसांनी लेखी पत्राद्वारे कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान येत्या काही दिवसांत जर कारवाई झाली नाही तर आम्ही दर्ग्या शेजारी शंकराचे मंदीर बांधण्याचा संकल्प केला आहे तो पुर्ण करूच. असा इशारा मनसेचे पाचंगे यांनी दिला आहे.

अखेर प्रशासनाला जाग !
भारतीय वायुसेनेच्या अधिकार्‍यांनी पत्रव्यवहार करूनही वन विभाग आणि जिल्हा प्रशासनाने येथील बेकायदा बांधकामे त्वरीत हटविण्यासंदर्भात कोणतीच पावलं उचलली नव्हती. अखेर हा विषय मनसेच्या हाती आल्यानंतर अतिक्रमण हटविण्यासंदर्भात प्रशासनाला मागणी केली. त्यानंतर दोन दिवसातच अखेर प्रशासनाला जाग आली असून याची दखल घेत कारवाई होण्याची हमी पोलिसांनी पत्राद्वारे दिली आहे तसेच या परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य न करण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -