ठाण्यात लोकसहभागातून उभा राहणार आदर्श नाला बांधणी प्रकल्प

समस्या, दुर्गंधी आणि भ्रष्टाचाराचे कुरण ही नाल्यांची ओळख आता संपुष्टात आणण्यासाठी ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी पुढाकार घेतला आहे. तसेच त्यांच्या संकल्पनेनुसार आणि मार्गदर्शनाखाली जागर फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून ठाणे शहरातील डॉ. मूस मार्गालगत आदर्श नाले बांधणी प्रकल्प आणि नाले दत्तक योजना राबवण्यात येत आहे.

Adarsh ​​Nala construction project to be built through public participation in Thane PPK
समस्या, दुर्गंधी आणि भ्रष्टाचाराचे कुरण ही नाल्यांची ओळख आता संपुष्टात आणण्यासाठी ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी पुढाकार घेतला आहे. तसेच त्यांच्या संकल्पनेनुसार आणि मार्गदर्शनाखाली जागर फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून ठाणे शहरातील डॉ. मूस मार्गालगत आदर्श नाले बांधणी प्रकल्प आणि नाले दत्तक योजना राबवण्यात येत आहे.

ठाणे : समस्या, दुर्गंधी आणि भ्रष्टाचाराचे कुरण ही नाल्यांची ओळख आता संपुष्टात आणण्यासाठी ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी पुढाकार घेतला आहे. तसेच त्यांच्या संकल्पनेनुसार आणि मार्गदर्शनाखाली जागर फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून ठाणे शहरातील डॉ. मूस मार्गालगत आदर्श नाले बांधणी प्रकल्प आणि नाले दत्तक योजना राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन शुक्रवारी (ता. 26 मे) करण्यात आले. त्यामुळे भविष्यात हा नाले दत्तक योजनेचा पॅटर्न ठाणे पॅटर्न म्हणून नावारूपास येईल, असे मत व्यक्त करण्यात आले आहे. तर नालेसफाईतील हात सफाईला या प्रकल्पामुळे ब्रेक बसेल असेही बोलले जात आहे.

हेही वाचा – मुंबईत 226 अतिधोकादायक इमारती; रहिवाशांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरीत होण्याचे महापालिकेचे आवाहन

दरवर्षी नालेसफाई, त्यातून होणारा भ्रष्टाचार याबाबत आमदार संजय केळकर सातत्याने आवाज उठवत आहेत. याचबरोबर त्यांनी यावर रामबाण उपाय म्हणून आदर्श नाले बांधणी प्रकल्प आणि नाले दत्तक योजना ही संकल्पना ठाण्यात रुजवली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जागर फाऊंडेशन या संस्थेने ठाणे महापालिकेकडे प्रस्ताव दाखल केल्यानंतर आयुक्त अभिजित बांगर यांनी उपक्रमाचे कौतुक करीत तातडीने मंजुरी दिली. ही योजना लोकसहभागातून राबवण्यात येत असून ठाण्यातील विकासक मे. बोरकर रिअल्टी याकामी सहकार्य करत आहेत.

नंदिनी बोरकर-सारंगधर यांनी आदर्श आणि आधुनिक पद्धतीच्या नाले बांधणीचा आराखडा तयार केला आहे. सुमारे 90 मीटर लांबीचे आवरण या नाल्यावर चढविण्यात येणार असून दोन्ही बाजूला व्हर्टीकल गार्डन करण्यात येणार आहे. परिसरात मोठा कचरा येणार नाही, अशी बांधणी करण्यात येणार आहे. या योजनेचा फायदा येथील दीपक सोसायटी, जीवन शांती सोसायटी आदी संकुले आणि आजूबाजूच्या इमारतींना होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

नाले दत्तक योजना ही अन्य ठिकाणीही फायदेशीर ठरणार असून जागर फाऊंडेशनप्रमाणे याकामी अन्य संस्था आणि नागरीकांनी पुढे आल्यास नाले ही समस्या राहणार नाही. दरवर्षी नाले सफाईतून होणारा भ्रष्टाचार थांबू शकतो. आयुक्तांनी या उपक्रमास तातडीने हिरवा कंदील देऊन दूरदृष्टी दाखवली तर बोरकर रिअल्टीने घेतलेली भूमिकाही कौतुकास्पद आहे, असे आमदार संजय केळकर यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आमदार संजय केळकर यांच्यासह बोरकर रिअल्टीचे महेश बोरकर, माजी नगरसेवक सुनेश जोशी, नंदिनी बोरकर-सारंगधर, जागर फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेश सोंडकर, सचिव विनोद येतुस्कर, जयश्री रामाणे, विनोद पितळे, दीपक सोसायटी, जीवन शांती आदी गृहसंकुलांतील पदाधिकारी उपस्थित होते.