घरठाणेचार तासांनी अडकलेल्या गाईची सुखरूप सुटका; पडल्यामुळे शिंगाला आणि पायाला दुखापत

चार तासांनी अडकलेल्या गाईची सुखरूप सुटका; पडल्यामुळे शिंगाला आणि पायाला दुखापत

Subscribe

कल्याण-महापे रोड, शीळफाटा येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) जलवाहिनीमधील एक फुटाच्या रिकाम्या जागेत पाळीव गाय पडून अडकल्याची घटना शनिवारी सांयकाळच्या सुमारास समोर आली. त्या गाईच्या शिंगाला व मागील दोन पायांना दुखापत झाली असून तिला साडेतीन ते चार तासांनी सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र तिला पकडण्याचा प्रयत्न केला असता, ती जंगलात पळून गेली.

या घटनेची माहिती मिळताच ठाणे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दल आणि डायघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तातडीने बचाव कार्य हाती घेण्यात आले. साडेतीन ते चार तासांनी त्या गाईला तेथून बाहेर काढण्यात यश आले. यावेळी १ काँक्रिट ब्रेकर, १ गॅस कटर, १ हायड्रा व २ जेसीबी पाचारण केले होते. तर पडल्याने गाईच्या शिंगाला व मागील दोन पायांना दुखापत झाली असल्याने पकडण्याचा प्रयत्न केला परंतु ती बाजूच्या जंगलामध्ये पळून गेल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -