घर ठाणे परिचारिकांपाठोपाठ आता कळवा रुग्णालयात इंन्टेसिव्हीट आणि अधिव्याख्यातांची भरती

परिचारिकांपाठोपाठ आता कळवा रुग्णालयात इंन्टेसिव्हीट आणि अधिव्याख्यातांची भरती

Subscribe

ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ७२ परिचारिकेपाठोपाठ आता आयसीयुत काम करणारे ९ इंन्टेसिव्हीट व २८ अधिव्याख्यातांची भरती करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. तसेच या ३७ पदांसाठी येत्या ३१ आॅगस्ट रोजी थेट मुलाखती होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
मागील आठवड्यात एकाच दिवशी कळवा रुग्णालयात १८ रुग्णांचा मृत्यु झाला होता. या दुर्देवी घटनेनंतर या ठिकाणी असलेल्या अनेक असुविधांची चर्चा झाली होती. तसेच येथील अपुऱ्या मनुष्यबळावर देखील अनेकांनी आक्षेप घेतला होता. कळवा रुग्णालयात १२५ शिकाऊ आणि १५० च्या आसपास तज्ञ डॉक्टर आहेत. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी महापालिकेच्या माध्यमातून डॉक्टर व इतर महत्वाची पदे भरण्याची तयारी केली होती. परंतु कमी पगार असल्याने अनेकांनी त्याकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले.

दरम्यान मागील आठवड्यात झालेल्या दुर्देवी घटनेनंतर आता पुन्हा एकदा आरोग्य विभागाने रिक्त पदे भरण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. आता आरोग्य विभागाने ७२ पदे कंत्राटी स्वरुपात भरण्याची तयारी सुरु केली आहे. यापुढे जाऊन आयसीयु विभागात महत्वाचे मानले जाणारे ९ इंन्टेसिव्हीट भरती केले जाणार आहेत. यापूर्वी ११ पदांसाठी महापालिकेने मुलाखती घेतल्या होत्या. त्याला केवळ २ उमेदवारांनी पंसती दिली होती. उर्वरीतांनी कमी पगार म्हणून माघार घेतली होती. आता मात्र पुन्हा ९ पदांची भरती करण्याची तयारी केली आहे. त्यातच दुसरीकडे २८ अधिव्याख्यातांची पदे देखील भरली जाणार आहेत. यात बायोकेमिस्ट्री ०१, फार्मकॉलजी ०३, पी.एस.एम. ०४, जनरल मेडीसीन ०३, स्किन ०१, पीडीयाट्रीक ०१, सर्जरी ०५, ओबीजीवाय ०४, अ‍ॅनेस्थेशिया ०४ आणि इमर्रजन्सी मेडीसीन ०१ व फिजिकल मेडीसीन अ‍ॅण्ड रिहॅबिलीटीशन ०१ आदींचा समावेश आहे. या पदांसाठी महापालिकेने वाढीव पगार देण्याची तयारी केली आहे. त्यानुसार येत्या ३१ ऑगस्ट रोजी थेट मुलाखती होणार आहेत. अशी माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -