घर thane ठाण्यात भुजबळांविरोधातील आंदोलनानंतर अजित पवार गटाकडून जशास तसे उत्तर

ठाण्यात भुजबळांविरोधातील आंदोलनानंतर अजित पवार गटाकडून जशास तसे उत्तर

Subscribe

ठाणे : अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर होती. यानंतर शरद पवार गटाने छगन भुजबळांविरोधात आंदोलन केली. ठाण्यातील आंदोलन हे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या आंदोलनात छगन भुजबलांचा पुतळा जाळण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाने देखील जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात ठाण्यात आंदोलन केली. यावेळी अजित पवार गटाने जितेंद्र आव्हाड यांचा पुतळा जाळून जशास तसे उत्तर दिले, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रवक्ते व ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली.

जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने छगन भुजबळ यांच्या कथीत उद्गाराचा आधार घेत. भुजबळ यांना गद्दार संबोधून ठाण्यात त्यांचा पुतळा जाळण्यात आला. यामुळे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले.  या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठाणे महापालिकेसमोर जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची होळी केली. यावेळी जितेंद्र आव्हाड मुर्दाबाद,  छगन भुजबळसाहेब झिंदाबाद, एकच वादा अजित, अशा घोषणा दिल्या. याप्रसंगी ठाणे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वनिता गोतपगार, ठाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नित्यानंद उर्फ वीरु वाघमारे, ठामपा परिवहन सदस्य मोहसीन शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा – शरद पवारांवरील टीकेनंतर छगन भुजबळांविरोधात ठाण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

जशास तसे उत्तर देऊ 

यावेळी पत्रकारांशी बोलताना आनंद परांजपे यांनी म्हटले की, आमचे नेते व बहुजनांचे नेते छगन भुजबळ यांनी काही कथित वक्तव्य केली म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी भुजबळांना पुतळा जाळला आणि त्यांना गद्दार म्हटले. आव्हाडांचा विरोध केला की, मुळात गद्दार कोण हे क्रियेतून कळाले असेल आणि अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पुतळा जाळला.जितेंद्र आव्हाडांना जशास तसे उत्तर दिले जाईल. हातात दोरा गंडा बांधून पुरोगामी भाषा करुन कोणी बहुजन नेता होत नाही. यांचे ठाणे व येऊर येथील बंगल्यात काय धंदे चालतात त्याची शोधपत्रकारिता करावी, असा सल्लाही आनंद परांजपे यांनी दिला.”

- Advertisement -

 

- Advertisment -