घरठाणेकल्याण पूर्वेतील हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत सर्वधर्मियांचा सहभाग

कल्याण पूर्वेतील हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत सर्वधर्मियांचा सहभाग

Subscribe

भारतीय हिंदू संस्कृती प्रमाणे सुरु झालेल्या नवीन वर्षाच्या प्रारंभी आणि गुढी पाडव्याच्या सकाळी कल्याण पूर्वेत हिंदू नव वर्ष स्वागतासाठी निघालेल्या भव्य नव वर्ष स्वागत यात्रेत विविध जाती – धर्म पंथांच्या समाज बांधवांनी उत्सुर्तपणे सहभाग घेऊन सामाजिक एकतेचा अनोखा संदेश दिला. या यात्रेत हिंदू संस्कृतीच्या विविधांगी छटा पहायला मिळाल्या. हिंदू नव वर्ष स्वागत यात्रा समितीचे अध्यक्ष आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते कर्मवीर दादासाहेब गायकवाड क्रिडा पटांगणा जवळील श्री साई बाबांच्या मंदीरा समोर गुढीचे पुजन करून या यात्रेचा प्रारंभ करण्यात आला.

या यात्रेत पारंपारिक पद्धतीचा साज असलेले बासरीवाला ढोल पथक, संबळ वादक गोंधळी पथक, सम्राट अशोक विद्यालयाच्या कलश धारी विद्यार्थिनी – विद्यार्थी, वारकरी संप्रदायाचे वारकरी पथक, श्री संप्रदायचा रथ, नाणीजचे सेवेकरी, जेष्ठ नागरीक संघाचे सदस्य, अंगणवाडी बाल विकास संस्थेच्या महिला भगिनी यांच्यासह भारतीय इतिहास आणि पुराणातील अनेक घटना दर्शवणाऱ्या आणि वेशभूषा केलेले अनेक वेशभूषाधारी सहभागी झाले होते. उल्लेखनिय बाब म्हणजे या यात्रेत विविध जाती धर्म पंथाचे प्रतिनिधीत्व करणारे अनेक मान्यवर आणि समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या यात्रेत बाईक रॅली, सायकल रॅली याच बरोबर पारंपारिक वेषभूषा तसेच सेल्फी, व्हिडीओ रिल करण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या गुण प्रदानाचे नियोजन राजेश गरीबे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना यात्रेच्या सांगता समारोपावेळी पारितोषीके देवून सन्मानित करण्यात आले. कोळसेवाडीतून प्रारंभ झालेली ही रॅली मुख्य बाजार पेठेतून पुढे म्हसोबा चौक, तिसगांव नाका मार्गे तिसाई मंदीराच्या प्रांगणात पोहचल्या नंतर या ठिकाणी यात्रेची सांगता करण्यात आली.

- Advertisement -

या यात्रेत माजी नगरसेवक मनोज राय, अभिमन्यू गायकवाड, प्रभाग ४ जे च्या सहाय्यक आयुक्त सविता हिले, कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक महेंद्र देशमुख, सहयोग संस्थेचे विजय भोसले, स्टडी व्हेवचे उमाकांत चौधरी, भगवान भोईर, दत्ता गायकवाड, संजय मोरे, सुभाष म्हस्के, संदिप तांबे, मनोज बेळमकर, संतोष पाटील, वंदना मोरे, आंबेडकरी विचारधारेचे अण्णासाहेब रोकडे, महादेव रामभोळे, अमित सोनवणे, हरी भालेराव आदी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात्रेच्या सांगता समारोहात यात्रेसाठी सहकार्य करणाऱ्या विविध संस्था संघटना तसेच मान्यवरांचा आमदार गणपत गायकवाड यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्र संचलन विष्णू जाधव यांनी केले तर उपस्थितांचे आभार संदिप तांबे यांनी मानले.

शिवसेनेच्या नववर्ष स्वागत यात्रेत सामाजिक विषयांवर जनजागृती
गुढीपाडव्या निमित्त कल्याण पूर्वेत शिवसेना प्रभाग क्र. 97 च्या वतीने माजी नगरसेवक राजाराम पावशे यांच्या पुढाकाराने हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन काटेमानीवली परिसरात करण्यात आले होते. या यात्रेत विविध सामाजिक विषयांवर जनजागृती करण्यात आली. यंदा या स्वागत यात्रेचे 10 वे वर्ष होते. कोरोना काळात या यात्रेत खंड पडला होता परंतु यावर्षी पुन्हा त्याच जोमाने ही नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत यामध्ये प्रभागातील महिला, नागरिक पारंपरिक वेशभूषा करून मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रभाग क्र. ९७ शिवसेना कार्यालय, जाईबाई विद्यालय, साईनगर, काटेमानीवली नाका, हनुमान नगर, भगवान नगर याभागातून हि स्वागत यात्रा काढण्यात. यावेळी पाणी वाचवा, झाडे लावा झाडे जगवा, मुलगी वाचवा यासह आरोग्याचा संदेश देण्यात आला असल्याची माहिती माजी नगरसेवक राजाराम पावशे यांनी दिली.

- Advertisement -

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -