केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना त्यानुसार नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत लागलेल्या सर्व कर्मचारी यांना कायम निवृत्ती लेखा क्रमांक (प्राण) या कार्ड घेणे आवश्यक आहे. या प्राण कार्डचे अनेक आर्थिक फायदे आहेत, प्राण कार्ड सर्व कर्मचारी यांच्याकरता फायदेशीर आणि सोयीचे आहे. असा उपक्रम सुरू करणारी राज्यातील भिवंडी ही पहिली महापालिका आहे, असे प्रतिपादन पालिका आयुक्त तथा प्रशासक अजय वैद्य यांनी केले.
एक नोव्हेंबर 2005 नंतर शासकिय सेवेत रुजू झालेल्या महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या राष्ट्रीय निवृत्ती योजनेअंतर्गत ‘एनपीएस’मध्ये समाविष्ट करण्याचे घेण्यात आले त्यानुसार प्रत्येक कर्मचारी याचा कायम निवृत्ती लेखा क्रमांक (प्राण) किट तयार करण्यात आले आहे. या प्राण कार्ड कीट वितरण उपक्रमाची सुरुवात प्रशासक तथा आयुक्त अजय वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी पालिका आयुक्त अजय वैद्य बोलत होते. पालिका आयुक्तांच्या दालनात झालेल्या या कार्यक्रमात पालिका अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके, सामान्य प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळाराम जाधव, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले,भविष्य निर्वाह निधी विभाग प्रमुख प्रकाश राठोड, भविष्य निर्वाह निधी विभाग कार्यालय अधीक्षक अनिल राठोड आणि अन्य कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
केंद्र आणि राज्य सरकार यांच्या निर्णायानुसार हे प्राण कार्ड उपलब्ध करून देण्यात येत आहे. एक नोव्हेंबर 2005 नंतर पालिका सेवेमध्ये रुजू झालेले सुमारे जवळपास एकोणीसशे कर्मचारी कार्यरत आहेत. अशा सर्व कर्मचारी यांचे कायम निवृत्ती लेखा क्रमांक (प्राण) कार्ड काढण्यात येणार आहे. कायम निवृत्ती लेखा क्रमांक अर्थात प्राण मिळण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे,पासवर्ड घेणे अशा इतर प्रशासकीय बाबी पूर्ण करण्यात आले असून, सद्याचे निवृत्ती वेतन धारक कर्मचारी यांना ज्या प्रमाणे आर्थिक फायदे मिळतात,त्याप्रमाणे या प्राण कार्डचे आर्थिक फायदे 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेले सर्व कर्मचारी यांना मिळणार आहेत. 2005 नंतर शासकीय सेवेत आलेली सर्व कर्मचारी यांनी कायम निवृत्ती वेतन लेखा क्रमांक म्हणजेच प्राण कार्ड हे सर्व कर्मचारी यांनी काढून घ्यावे, असे आवाहन पालिका आयुक्त यांनी या प्रसंगी केले. केंद्र आणि राज्य सरकार यांच्या निर्देशानुसार राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना राबविणारी भिवंडी महानगरपालिका ही महाराष्ट्रात पहिली महापालिका आहे. हा उपक्रम राबविणारे भविष्य निर्वाह विभाग प्रमुख प्रकाश राठोड व त्यांच्या सर्व अधिपत्याखालील कर्मचारी वर्गाचे आयुक्त यांनी या प्रसंगी विशेष अभिनंदन केले.