HomeठाणेAmbarnath Crime : आमदार बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट उघड

Ambarnath Crime : आमदार बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट उघड

Subscribe

हत्येचा कट केल्याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केली असल्याची आमदार बालाजी किणीकर यांनी माहिती दिली.

ठाणे । शिवसेना शिंदे गटाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचल्याचे समोर आले आहे. याबाबत आमदार बालाजी किणीकर यांनी सांगितले कि, मागील १५ दिवसांपासून याची व्यूव्हरचना केली जात होती. पोलिसांच्या ठाणे गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला असून चौकशी केली जात असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. मला पोलिसांवर विश्वास असून याची माहिती आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्याचेही आमदार बालाजी किणीकर यांनी प्रसिद्दी माध्यमांशी बोलताना सांगितले.
किणीकर लातूरला आपल्या भावाच्या मुलाच्या लग्नकार्यासाठी गेले आहेत. तेथून परतल्यावर ते याविषयी माहिती देण्याची शक्यता आहे. मात्र या प्रकारानंतर किणीकर यांचे समर्थक आक्रमक झाले असून अंबरनाथ बंदची हाक देण्याची शक्यता आहे. सरपंच देशमुख यांची हत्या, चिमुकलीचा अत्याचार करून केलेली कल्याण येथील हत्या तसेच सतत वाढणार्‍या घटना यामुळे कायदा सुव्यवस्थेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता सत्ताधारी पक्षातील आमदारांच्याच हत्येचा कट रचल्याचे उघड झाले. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचल्याचे समोर आले आहे.

दोन जणांना अटक
हत्येचा कट केल्याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केली असल्याची आमदार बालाजी किणीकर यांनी माहिती दिली. तसेच त्यांनी सांगितले कि, काही सूत्रांच्या माध्यमातून माझ्या हत्येचा कट रचला गेला, अशी माहिती मला मिळाली होती. ती माहिती घेऊन मी पोलिसांकडे गेलो होतो. त्यावेळी पोलीस याप्रकरणात आधीपासूनच चौकशी करत असल्याची माहिती त्यांनी दिल्याचे आमदार किणीकर यांनी सांगितले मागील १५ दिवसांपासून हा कट रचला जात होता, मला पोलिसांवर विश्वास आहे आणि याबाबत मी आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती दिली आहे, असे आमदार बालाजी किणीकर यांनी सांगितले.

- Advertisement -

या कट प्रकरणातील दोन जण फरार असून पोलीस पथक त्यांच्या शोधासाठी दिल्लीत दाखल झाले आहे. यानंतर किणीकर यांच्यासाठीच्या पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. आमदार किणीकर हे अंबरनाथ मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून आले आहेत. ते भावाच्या मुलाच्या लग्नासाठी लातूरला जाणार होते, या ठिकाणी त्यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यातील अटकेत असलेल्या दोघांपैकी एकाला खुंटवली तर दुसर्‍याला स्वामीनगर भागातून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. आमदार किणीकर यांना याआधीही काही असमाजिक घटकांकडून धमक्या आल्या असल्याची माहिती आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -