Maharashtra Assembly Election 2024
घरठाणेAmbarnath : अंबरनाथमध्ये किणीकरांचे वर्चस्व कायम

Ambarnath : अंबरनाथमध्ये किणीकरांचे वर्चस्व कायम

Subscribe

अंबरनाथ । अंबरनाथ विधानसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे डॉ बालाजी किणीकर आणि शिवसेना ठाकरे गटाचे राजेश वानखडे यांचा तब्ब्ल 51 हजार मताधिक्याने पराभव केला. मात्र शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत वादामुळे ही निवडणूक किणीकर यांना खूप जड गेली. या निवडणुकीत लाडकी बहिण योजनेसोबत किणीकर यांची रणनीती त्यांच्या विजयीसाठी महत्वाची ठरली. अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या दोन गटातील अंतर्गत वाद विकोपाला गेला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीच्या आधी सेनेचे माजी शहर प्रमुख अरविंद वाळेकर आणि डॉ. किणीकर यांना वर्षा बंगल्यावर बोलावून दोघांत समेट घडवून आणला होता. त्यानंतर अंबरनाथकरांना वाटले हा वाद संपला आहे. परंतू काही दिवसांनी वाळेकर हे प्रतिस्पर्धी उमेदवार राजेश वानखडे यांना मदत करीत असल्याच्या चर्चा मतदार संघात होऊ लागल्याने किणीकर यांच्या गोटात काही काळासाठी अस्वस्थता पसरली होती. परंतू किणीकर आणि त्यांच्या समर्थकांनी वाळेकर यांच्याकडे दुर्लक्ष करीत निवडणूक जिंकण्याचा संकल्प केला.

मतदार संघात सुरवातीला वानखडे यांचा प्रचार कुठेच दिसत नव्हता. परंतू शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या सभेनंतर वानखडे यांनी प्रचारात आघाडी घेतली. या सभेत काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी वानखडे यांना समर्थन दिल्याने वानखडे यांना बळ मिळाले. दुसरीकडे शिवसेनेचे अरविंद वाळेकर यांनीदेखील वानखडे यांना अप्रत्यक्ष रित्या समर्थन दिल्याने वानखडे यांची हवा तयार झाली होती. उल्हासनगरातील काही माजी नगरसेवकांनी देखील वानखडे यांना साथ दिल्याने डॉ. किणीकर यांची चिंता वाढली होती. एकीकडे दमदार नेत्यांची साथ मिळाल्याने वानखडे यांची बाजू सशक्त होत असताना दुसरीकडे वानखडे यांनी त्यांच्या होम टाऊन म्हणजे सुभाष टेकडी, समता नगर, कुर्ला कॅम्प, लाल चक्की, संभाजी चौक पंचशील नगर, भरतनगर, नागसेन नगर, नेताजी परिसर, कॅम्प नंबर पाच येथील संपूर्ण सिंधी बहुल भागाकडे दुर्लक्ष केल्याने त्यांना त्यांचा अती आत्मविश्वास नडला. तर ही पोकळी किणीकर यांनी हेरली. त्यांनी या भाग पिंजून काढला.

- Advertisement -

डम्पिंग ग्राउंडमुळे कॅम्प नंबर पाचचे व्यापारी नाराज होते. वानखडे यांनी हा मुद्दा व्यवस्थित हाताळला असता तर त्यांना फायदा झाला असता. परंतु त्याचा उपयोग किणीकर यांनी मोठ्या शिताफीने करून घेतला. यातून भाजप आणि शिवसेनेचे नेत्यांना आणि व्यापार्‍यांना आपल्या बाजूने वळवून मोठी ताकद आपल्या बाजूला वळती करून घेतली. डॉ. किणीकर यांचे या भागात आधीपासून चांगला जनसंपर्क आहे. तसेच स्थानिक इतर पक्षांच्या स्थानिक नेत्यांशीही त्यांचा संवाद आहे. याचाही लाभ त्यांना झाला. डॉ. किणीकर यांनी शेवटच्या टप्यात प्रचारात आघाडी घेऊन निवडणुक आपल्या बाजूने केली. त्यांनी वानखडे यांचा 51 हजार इतक्या मताधिकायाने पराभव केला. आपल्या विकासकामांमुळे हे यश मिळाल्याचे किणीकर म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -