घरठाणेआनंद परांजपे म्हणजे जिधर बोजा उधर सोजा; उल्हासनगरच्या राष्ट्रवादी  कांग्रेस अध्यक्षांचा हल्लाबोल

आनंद परांजपे म्हणजे जिधर बोजा उधर सोजा; उल्हासनगरच्या राष्ट्रवादी  कांग्रेस अध्यक्षांचा हल्लाबोल

Subscribe

ठाणे पालघर समन्वयक पदावरून हटवण्याची मागणी

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्षा हरकिरण कौर धमी यांनी राष्ट्रवादीचे माजी खासदार तसेच ठाणे पालघर जिल्हा समन्वयक यांच्यावर अनेक खळबळजनक आरोप करत त्यांना पदावरून हटवण्याची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्राद्वारे केली आहे. या पत्रात त्यांनी अनेक मागण्या केल्या आहेत तसेच त्यांना आलेला अनुभव पत्रात नमूद केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेठाणे-पालघर समन्वयक आंनद परांजपे यांचा अत्यंत नकारात्मक अनुभव आल्याचा त्यांनी आरोप त्यांनी केला आहे. त्यापेक्षाही त्यांच्या कारवाया पक्ष हिताच्या विरोधात असल्याचं लक्षात आल्यावरून सदर निवेदन आपणास देत असल्याचं या पत्रात म्हटलं आहे. राजकारणाची कौटुंबिक पार्श्वभूमी असली तरी मी स्वतः राजकारणात फारशी कार्यरत नव्हते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचं आणि पक्षाचे नेता शरद पवार साहेब यांचं महिलांविषयक पूरक धोरण असल्याने मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जिल्हाध्यक्षांची जबाबदारी स्वीकारली. राष्ट्रवादीच्या राज्यस्तरीय नेत्याकडून आम्हाला महत्त्वपूर्ण पाठबळ मिळाले. असं पाठबळ आम्हाला ठाणे -पालघर जिल्हयाचे समन्वयक आनंद परांजपे यांच्याकडूनही अपेक्षित होतं. परंतु त्यांना आमच्याबद्दल काय आकस आहे , याची कल्पना नाही , पण त्यांचे वर्तन हे नेहमीच असहकाराचे , नकारात्मक आणि अडवणूक करणारे राहिले आहे . असा थेट आरोप त्यांनी केला आहे.

- Advertisement -

पक्षाच्या कार्यक्रमांचे आयोजन असो उल्हासनगर महानगरपालिकेत स्थायी समितीत अनुसूचित जाती समाज घटकातील महिलेची नेमणूक असो की अगदी अलीकडच्या काळातील विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नेमणुका असोत , परांजपे यांनी या शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या विरोधी लोकांना पूरक अशीच भूमिका घेतली असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.  आनंद परांजपे हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी विरोधी काम करत असलेल्या अत्यंत संधीसाधू ‘ जिधर बोझा , उधर सो जा ‘ धोरण असलेल्या टीओके नावाच्या टोळीशी संगनमत करून असुन , ते घेत असलेले निर्णय हे राष्ट्रवादीपेक्षा त्या टोळीच्याच हिताचे जास्त असतात आणि आम्ही ते मान्य करत नाही , एवढयावरून आनंद परांजपे आमची वेळोवेळी अडवणूक करत असल्याचा आरोप केला आहे.

ठाणे जिल्हयात येऊ घातलेल्या निवडणुका लक्षात घेता आनंद परांजपे यांना पक्ष हिताच्या दृष्टीने समन्वयक पदावरून मुक्त करून तिथे सर्वांना सामावून घेईल अशी व्यक्ती त्या पदावर आणावी  उल्हासनगर शहर जिल्हयातील पक्ष कार्यात ढवळाढवळ करण्यास आनंद परांजपे यांना प्रतिबंध करावा तसेच विशेष कार्यकारी पदाचे अर्ज उल्हासनगर शहर जिल्हास्तरावर आम्हाला थेट मिळावेत . अशा मागण्या त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केले आहेत. मात्र यावर आनंद परांजपे यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -