घरठाणे...आणि त्याला आत्महत्येपासून परावृत्त केले

…आणि त्याला आत्महत्येपासून परावृत्त केले

Subscribe

खडकपाडा पोलिसांची कामगिरी

विद्युत ट्रान्सफॉर्मरच्या संपर्कात येत आत्महत्या करण्याचा प्रयत्न एक व्यक्ती करत असल्याचा प्रकार खडकपाडा पोलीस स्टेशनच्या गस्तीवर असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश यशवंतराव यांच्या लक्षात आला. त्यांनी या व्यक्तीला समजावून सांगत बोलण्यात गुंतवून ठेवले. त्यानंतर त्याच्यावर अचानक झडप घालीत त्याला ताब्यात घेऊन आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले.

बुधवारी रात्रीच्या सुमारे साडे बारा एकच्या दरम्यान शहाड येथील बँक ऑफ इंडियाच्या बाजूला  विद्युत ट्रान्सफॉर्मर जवळ एक ३५ वर्षीय इसम पोलिसांचे रात्रीचे गस्त पथक फिरत असतानाच सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश यशवंतराव व पोलीस नाईक धूळखंड आणि बांगर यांच्या नजरेत आला. त्यांनी त्याला हटकले. मी विद्युत ट्रांसफार्मर जवळ आत्महत्या करण्यासाठी आल्याचे त्यांने. आर्थिक अडचणींमुळे कौटुंबिक जबाबदारी आपण पार पाडू शकत नसल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचे त्याने काही अंतरावरुन पोलिसांना सांगितले. यशवंतराव यांनी आपण तुला सर्व मदत करू, तुझी अडीअडचण सोडवू अशा प्रकारे त्याला बोलण्यात गुंतवून आपल्या सहकाऱ्यासोबत त्याच्यावर प्रेमाची झडप घालून ताब्यात घेतले.

- Advertisement -

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या ३५ वर्षीय इसमाचे समुपदेशन करीत त्यास आत्महत्या करण्यापासून सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश यशवंतराव यांनी परावृत्त केले. त्याला त्याच्या राहत्या घरी घेऊन जात कुटुंबियांच्या ताब्यात दिले. मरणाच्या उंबरठ्यावर असलेल्या इसमाला परावृत्त केल्याने यशवंतराव यांचे विशेष कौतुक केले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -