घरठाणेविना मास्क फिरल्यास अँटिजेन टेस्ट

विना मास्क फिरल्यास अँटिजेन टेस्ट

Subscribe

दंडात्मक कारवाईचा बडगा

मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारल्यानंतरही बदलापुरात काही नागरिक विनामास्क फिरत आहेत. त्यामुळे आता अशा बेफिकीर नागरिकांची अँटिजेन टेस्ट करण्याचा निर्णय कुळगाव बदलापूर नगर परिषद प्रशासनाने घेतला आहे. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करण्याबाबत शासनाकडून, नगर परिषद प्रशासनाकडून सातत्याने आवाहन करण्यात येत आहे. त्यानंतरही अनेक लोक विनामास्क फिरत असल्याचे आढळून आल्याने नगर परिषद प्रशासनाने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारत मोठ्या प्रमाणात दंड वसुली केली. मात्र त्यानंतरही अनेक नागरिक विनामास्क फिरत असल्याचे आढळून येत आहेत.

त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका असल्याने अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच त्यांची अँटिजेन टेस्ट करण्याचे नगर परिषद प्रशासनाने ठरविले आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषद मोबाईल टेस्टिंग व्हॅनद्वारे विनामास्क फिरणाऱ्यांची अँटीजेन टेस्ट करणार आहे.

- Advertisement -

या टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळणाऱ्या नागरिकांची रवानगी सोनिवली येथील क्वारटाइन सेंटरमध्ये करण्यात येणार आहे. अलीकडेच कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी मोबाईल टेस्टिंग व्हॅनला संरक्षण मिळण्याबाबतचे पत्र बदलापूर पूर्व व पश्चिम पोलीस ठाण्याला दिले आहे. दरम्यान, राज्यातील अनेक नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रात विनामास्क फिरणाऱ्यांना आळा घालण्यासाठी असे प्रयोग करण्यात येत आहेत. आता बदलापूरातही हा प्रयोग राबविण्यात येणार असून त्यामुळे विनामास्क फिरणाऱ्यांवर आळा बसणार असून कोरोनाचा संसर्ग कमी होण्यासही मदत होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -