Tuesday, February 23, 2021
27 C
Mumbai
घर ठाणे विद्यार्थ्यांमध्ये कसा वाढेल वैज्ञानिक दृष्टीकोन ?

विद्यार्थ्यांमध्ये कसा वाढेल वैज्ञानिक दृष्टीकोन ?

विज्ञान पदवीधर असतानाही कला पदवीधरांच्या नियुक्त्या

Related Story

- Advertisement -

मुरबाड तालुक्यातील 6 ते 8 च्या वर्गांना विज्ञान आणि गणित शिकविण्यासाठी विज्ञान पदवीधरांच्या नेमुका करण्याऐवजी स्वयंसेवक शिक्षकांच्या नेमणुका केल्या. ज्या शाळांमध्ये विज्ञान शिक्षकांची आवश्यकता होती त्याठिकाणी समाजशास्र पदवीधारांच्या नेमणुका केल्याने विज्ञान पदविधारांच्या पदोन्नती रखडल्या आहेत. वारंवार जिल्हा परिषदे कडे पाठपुरावा करून कोर्टाच्या निर्णयांचा हवाला देऊनही ठोस कारवाई होत नसल्याने भविष्यात विज्ञान पदवीधर आक्रमक होण्याची चिन्हे दिसत आहेत.

सहा सप्टेंबर 2014 रोजी जिल्हा परिषद ठाणे येथे पदवीधर पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्यात आली होती. विज्ञान पदवीधर शिक्षक उपलब्ध न झाल्याने बारावी विज्ञान ज्यांचे झाले आहे. त्यांना विज्ञान अपदवीधर शिक्षक म्हणून नेमणुका देण्यात आल्या. त्यावेळी बीएस्सी पूर्ण झालेले जिल्हा परिषद ठाणे मध्ये केवळ 22 विज्ञान पदवीधर म्हणून विज्ञान शिक्षक नेमण्यात आले होते. बारावी विज्ञान म्हणून नेमणूक केलेले बऱ्याच शिक्षकांचे आता बीएससी पूर्ण झाले आहे. असे संपूर्ण जिल्ह्यात 120 शिक्षक आहेत. जवळ जवळ सात वर्षे पूर्ण होत आली. तरी पदोन्नती प्रक्रिया राबवण्यात येत नाही. सहा ते आठ वर्गांना विज्ञान विषय शिक्षक उपलब्ध असून सुद्धा पदोन्नती देण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

- Advertisement -

त्याचबरोबर विज्ञानवादी युगात व डिजिटल भारताचे स्वप्न पाहणारेच यात अडचण निर्माण करीत आहेत. सहा ते आठ इयत्तेला विज्ञान विषय शिक्षक अनिवार्य आहे. वेळोवेळी जिल्हा परिषदेला पत्रव्यवहार करूनही आजपर्यंत विज्ञान विषय पदवीधर शिक्षकांना न्याय मिळालेला नाही. याबाबत कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करून उस्मानाबाद, चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, बुलढाणा, जिल्ह्यात विज्ञान शिक्षकांना पदोन्नती व वेतन्नोती सुद्धा देण्यात आली आहे. त्यामुळे वेतन्नोती नाही मिळाली तरी चालेल, मात्र विज्ञान पदवीधर म्हणून पदोन्नती तरी द्यावी. जेणेकरून वर्ग 6 ते 8 च्या विद्यार्थ्याना गणित विज्ञानाची गोडी निर्माण होणार आहे. एकीकडे शासन गणित विज्ञानाची गुणवत्ता व दृष्टिकोण वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवीत आहेत. तर ठाणे जिल्हा परिषद या शिक्षकांना 6 ते 8 ऐवजी 1 ते 5 च्या वर्गांना या शिक्षकांना राबवीत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर विज्ञान पदवीधर शिक्षकांना पदोन्नती देऊन त्यांना 6 ते 8 च्या वर्गांना अध्यापन करण्याची संधी देऊन त्यांच्या ज्ञानाचा सन्मान करावा अशी मागणी हे शिक्षक करीत आहेत.

” दर महिन्याला जिल्हा परिषद ठाणेकडे पत्रव्यवहार केला जातो. यवतमाळ, चंद्रपूर, बुलढाणा, नागपूर, या जिल्ह्यातील विज्ञान पदवीधरांना पदोन्नती देण्यात यावी.”
-वसंत बेंडाळे, अध्यक्ष , महाराष्ट्र्र राज्य विज्ञान पदवीधर कृती समिती

- Advertisement -

” मुरबाड तालुक्यातील 33 टक्के मधील पदोन्नती 1995 च्या आसपास झालेली आहे. त्यामुळे आता पदोन्नती चा निर्णय जिल्हा परिषद घेईल ”
– शीला लंबाटे, गटशिक्षणाधिकारी, मुरबाड

- Advertisement -