घरठाणेपालिका कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले मंजूर करा; कर्मचारी कामगार सेनेची मागणी

पालिका कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले मंजूर करा; कर्मचारी कामगार सेनेची मागणी

Subscribe

लाखो रुपयांच्या वैद्यकीय बिलाची परतावा फाईल प्रशासकीय टेबलावर पडून असून ती मंजूर करण्याची मागणी म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेनेने पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना कोरोना काळात नागरिकांना सेवा देत असताना बाधित झालेल्यांची संख्या शेकडोंच्यावर असून पालिकेने उपचाराकरता स्थापित केलेल्या रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याने कर्मचाऱ्यांनी खासगी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांनी भरलेल्या लाखो रुपयांच्या वैद्यकीय बिलाची परतावा फाईल प्रशासकीय टेबलावर पडून असून ती मंजूर करण्याची मागणी म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेनेने पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.गेल्या तीन-चार महिन्यात कोरोना संसर्गाने कल्याण-डोंबिवली महापालिका परिसरात हजारो रुग्ण बाधित झाले होते. वाढत्या रुग्ण संख्येमुळे पालिका रुग्णालयात बेड मिळत नसल्याने पालिकेतील अधिकारी व कर्मचारी वर्गाने प्रायव्हेट रुग्णालयात अडमिट होऊन उपचार सुरू केले होते. या रुग्णालयांनी उपचारांचे लाखो रुपयांचे बिल काढल्याने कर्मचारी वर्गाने ते अदा केले होते.

या संदर्भात अधिकारी व कर्मचारी वर्गाने कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून सेवा दिली होती. अधिकारी, कर्मचारी वर्गाने याबाबत वैद्यकीय प्रतिपूर्तीची बिले प्रशासनाकडे देवूनही प्रलंबित ठेवल्याचा आरोप संघटनेचे नेते रवी पाटील यांनी केला असून प्रलंबित वैद्यकीय बीले तात्काळ मंजूर करण्याची मागणी पालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या संदर्भात पालिकेचे मुख्य लेखाधिकारी सत्यवान उबाळे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की कोणत्या विभागाचे कर्मचारी आहेत ते समजायला मार्ग नसून आमच्याकडे अनेक विभाग असून त्यांचे वैद्यकीय बिल आमच्याकडे आले नसून अशा कर्मचाऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, असे म्हटले आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -