Eco friendly bappa Competition
घर क्राइम चप्पल आणि बॅग ठेवण्यावरून वाद; वसईत प्रवासी लॉजिंगमध्ये थांबलेल्या गायकाची हत्या

चप्पल आणि बॅग ठेवण्यावरून वाद; वसईत प्रवासी लॉजिंगमध्ये थांबलेल्या गायकाची हत्या

Subscribe

वसईत हत्याकांडानं हादरली आहे. वसई पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील यात्री, प्रवासी विश्रामगृहात थांबलेल्या एका गायकाची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपीला अटक केली आहे. हत्येमागे क्षुल्लक कारण होतं. या हत्याकांडामुळे लॉजिंगमध्ये थांबणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

वसईत हत्याकांडानं हादरली आहे. वसई पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील यात्री, प्रवासी विश्रामगृहात थांबलेल्या एका गायकाची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपीला अटक केली आहे. हत्येमागे क्षुल्लक कारण होतं. या हत्याकांडामुळे लॉजिंगमध्ये थांबणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

राधाकृष्ण व्यंकट रमण असं मृत गायकाचं नाव आहे. याप्रकरणी राजू शहा नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. दोघेही रुम पार्टनर होते. पोलिसांनी आरोपी राजू शहा याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याने पोलिसांना हत्येची कबूली दिली आहे. (Arguments over keeping slippers and bags Murder of a singer who was staying at a traveler s lodging in Vasai)

…म्हणून हत्या केली

- Advertisement -

आरोपी आणि मृत व्यक्ती हे दोघेही वसई रोड पश्चिम परिसरातील एका प्रवाशी लॉजमध्ये राहत होते. आरोपी राजेश शहा हा वाहन चालक असून मागच्या चार वर्षांपासून या लॉजमध्ये राहत होता. तर हत्या झालेले राधाकृष्ण हे गायक असून मागच्या चार दिवसांपूर्वीच या लॉजमध्ये राहण्यासाठी आले होते. काल दुपारच्या सुमारास बॅग आणि चप्पल ठेवण्यावरून या दोघांत वाद सुरू झाला होता.

दोघांमधील हा वाद विकोपाला गेला आणि या वादातून राजेश शहा याने चक्क धारदार चाकूने राधाकृष्ण यांच्या छातीत एक जोरदार वार केला. त्यात चाकू त्यांच्या छातीत रुतून बसला. हा रुतून बसलेला चाकू काढण्याचा प्रयत्न झाला, पण तो निघाला नाही. शेवटी लॉड व्यवस्थापकाला ही घटना कळाल्यावर त्यानं जखमी गायकाला बाजूच्या खाजगी रुग्णालयात दाखल केलं. परंतु उपचारादरम्यान जखमीचा मृत्यू झाला. याबाबत माणिकपूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांनी दिली आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुला सोडणार नाही म्हणत प्रेयसीचा प्रियकरावर चाकूहल्ला )

- Advertisment -