घरठाणेचरस हॅशची इन्स्टावर जाहिरात करुन तस्करी करणार्‍यास अटक

चरस हॅशची इन्स्टावर जाहिरात करुन तस्करी करणार्‍यास अटक

Subscribe

31 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

ठाणे । चरस या अमली पदाथार्पासून बनविलेल्या चरस हॅश ऑईलची इन्स्टाग्रामवर जाहीरात करुन त्याची तस्करी करणार्‍या ऋषभ भालेराव याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी शुक्रवारी दिली. त्याच्याकडून 13 लाख 50 हजारांच्या 135 ग्रॅम चरस हॅशसह 31 लाख दोन हजारांचा अमली पदाथार्चा साठा जप्त केला आहे.

वागळे इस्टेट भागातील इंदिरानगर, भाजी मार्केटजवळ ऋषभ भालेराव हा त्याच्या गिर्‍हाईकांना गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे 7 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास विकास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक भूषण शिंदे, पल्लवी ढगे पाटील, अविनाश महाजन, उपनिरीक्षक तुषार माने आणि सुनिल अहिरे आदींच्या पथकाने सापळा रचून भालेराव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 30 हजार 200 रुपयांचा तीन किलो 200 ग्रॅम वजनाचा गांजा, 12 हजार 700 रुपयांचा एक मोबाईल आणि रोकड असा 42 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याकडील सखोल चौकशीमध्ये त्याच्या बदलापूर येथील घरातून आणखी 60 किलो 500 ग्रॅम वजनाचा गांजा, 290 ग्रॅम चरस आणि 19 छोटया बाटल्यांमध्ये चरस (हॅश) ऑईल आणि इतर वस्तू असा मुद्देमाल जप्त केला आहे.

- Advertisement -

इन्स्टाग्रामवरुन ऑनलाईन विक्री
भालेराव याने चक्क इन्स्टाग्रामवर गांजाची जाहीरात केली होती. त्यासाठी ‘गिर्‍हाईक’ मिळण्यासाठी तो इन्स्टाग्रामच्या अ‍ॅपवरुन ऑनलाईन अमली पदाथार्ंची विक्री करीत करीत होता. ही माहिती तपासात निदर्शनास आली आहे. त्याचे इन्स्टाग्रामवर साडे तीन हजारांहून अधिक फॉलोअर्स असून त्याद्वारे येणार्‍या गिर्‍हाईकांचे ऑनलाईन पैसे मिळाल्यानंतर कुरिअर मार्फतीने तो होम डिलीवरी करीत असल्याचे उष्घड झाले. ठाणे जिल्हयात प्रथमच अशा प्रकारे चरस या चरसपासून तयार केलेल्या हॅश ऑइलची विक्री केली जात होती. त्याने मध्यप्रदेशातून हा गांजा आणला होता. त्याचे आणखी कोणी साीदार आहेत का? आदी सर्व बाबींचा तपास आता सुरु आहे. त्याला 12 फेब्रुवारी 2024 पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -