Eco friendly bappa Competition
घर ठाणे ठाण्यात पर्यावरणभिमुख गणेश विसर्जनसाठी 42 ठिकाणी तयार करण्यात येणार कृत्रिम तलाव

ठाण्यात पर्यावरणभिमुख गणेश विसर्जनसाठी 42 ठिकाणी तयार करण्यात येणार कृत्रिम तलाव

Subscribe

ठाणे हे तलावांचे शहर असून पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून तलावांचे संवर्धन व्हावे, यासाठी गेली अनेक वर्षे ठाणे शहरातील घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन हे तलावात न करता ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून तयार करण्यात येत असलेल्या कृत्रिम तलावात केले जाते.

ठाणे : ठाणे हे तलावांचे शहर असून पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून तलावांचे संवर्धन व्हावे, यासाठी गेली अनेक वर्षे ठाणे शहरातील घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन हे तलावात न करता ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून तयार करण्यात येत असलेल्या कृत्रिम तलावात केले जाते. यावर्षी ठाणे शहरात कृत्रिम तलावांची संख्या वाढविण्यात आली असली तरी नागरिकांच्या सोईसाठी शहरातील विविध 42 ठिकाणी टाकीमध्ये विसर्जन व्यवस्था करण्यात येणार आहे. जमिनीत खड्डा न खणता जमिनीवर कृत्रिम तलाव निर्माण केले जाणार असून नागरिकांनी पर्यावरणभिमुख घरगुती गणेश विसर्जन करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे. (Artificial ponds will be created at 42 places for eco-friendly Ganesha immersion in Thane)

हेही वाचा – ठाण्यात 15 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर हा पंधरवडा ‘स्वच्छता लीग’ म्हणून साजरा होणार

- Advertisement -

घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन हे दीड, पाच, सात, नऊ आणि अनंतचतुदर्शी दिवशी मोठ्या प्रमाणावर होत असते. नागरिकांची विसर्जनघाटावर गर्दी होऊ नये, तसेच पर्यावरणभिमुख गणेशविसर्जन व्हावे यासाठी शहरातील गृहसंकुले, नागरीवस्ती अशा विविध 42 ठिकाणी टाकीमध्ये विसर्जन व्यवस्था करण्यात येणार आहे. दोन फूटापर्यंतच्या गणेशमूर्तीचे विसर्जन यामध्ये करता येईल, असे मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी नमूद केले आहे.

उथळसर प्रभागसमितीअंतर्गत रुस्तमजी 1, रुस्तमजी 2 (अटायर बिल्डिंग), परुळेकर मैदान, सिध्देश्वर टाकी, रुणवालनगर नागेश्वर मंदिराजवळ, परमार्थ निकेतनसमोर, ठामपा मुख्यालजवळ, कळवा प्रभागसमिती अंतर्गत 90 फीट रोड कळवा, सह्याद्री शाळा, सायबा क्रीडा नगरी मनिषानगर, खारेगाव नाका पोलीस चौकीमागील मैदान कळवा पूर्व, दिवा प्रभागसमितीअंतर्गत पडले बीएसयूपी दिवा, माय सिटी दिवा प्रभागसमिती, कल्याणफाटा आरोग्य केंद्र, अरिहंत आरोही कल्याण शीळ रोड, दिवा महोत्सव मैदान दिवा शिळ रोड, नौपाडा प्रभाग समिती अंतर्गत रहेजा संकुल, कशिश पार्क, सद्गगुरू गार्डन, बारा बंगला कोपरी, गावदेवी मैदान कोपरी, माजिवडा प्रभाग समिती अंतर्गत स्प्रिंग हिल सोसायटी वाघबीळ ते सरस्वती स्कूल रस्ता, विजयनगी ॲनेक्स, लोढा लक्झरीया माजिवडा, अर्बन पार्क गार्डन, हायलॅण्ड मैदान, मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत मुंब्रेश्वर शंकर मंदिर परिसर, शंकर मंदिर मुंब्रा, लोकमान्यनगर प्रभाग समिती अंतर्गत लोकमान्यनगर बसस्टॉप, लक्ष्मीपार्क- फेज 1- सिद्धीविनायक उद्यान परिसर, आचार्य अत्रे मार्ग कोसरस नक्षत्र संकुल परिसर, दोस्तीविहार संकुल परिसर, पु. ल. देशपांडे मार्ग रुणवाल प्लाझा परिसर, वर्तकनगर प्रभागसमिती अंतर्गत वसंतविहार क्लब हाऊस, समतानगर वेल्फेअर सेंटर, पवारनगर बसस्टॉपजवळ, स्वामी विवेकानंद म्हाडा वसाहत, सिद्धांचल संकुल इलाईट गार्डनजवळ, वागळे प्रभागसमिती अंतर्गत रस्ता क्र. 22 नेप्चुन कंपनीजवळ, रस्ता क्र. 22 पासपोर्ट कार्यालयाजवळ, पाण्याच्या टाकीजवळ श्रीनगर, अयप्पा मंदिरासमोर श्रीनगर, हिंदुस्थान हॉटेलजवळ अंबिकानगर आदी ठिकाणी टाकीमध्ये विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे.

नव्याने तयार करण्यात आलेले कृत्रिम तलावांची ठिकाणे

- Advertisement -

बोरीवडे गाव येथील मैदान – ब्रह्मांड ऋतुपार्क, बायर हाऊस – कोलशेत – रेवाळे तलाव – माजिवडा, घोलाईनगर कळवा पूर्व – खारेगाव तलाव, न्यू शिवाजी नगर – कळवा, मासुंदा तलाव दत्त घाट – नौपाडा, घोसाळे तलाव, कृत्रिम तलाव – उथळसर, उपवन तलाव पायलादेवी मंदिर, नीळकंठ ग्रीन्स – वर्तकनगर प्रभाग समिती, रायलादेवी 1 – रायलादेवी – 2 – वागळे इस्टेट, खिडकाळी तलाव – मुंब्रा, दातिवली तलाव – दिवा, या ठिकाणी नव्याने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

मूर्ती स्विकृती केंद्राची ठिकाणे

मढवी हाऊस, राम मारुती रोड, महागिरी कोळीवाडा, टेंभीनाका – नौपाडा, जेल तलाव – उथळसर, देवदयानगर शिवाईनगर – वर्तकनगर, कामगार हॉस्प‍िटल – लोकमान्यनगर, किसननगर बस स्टॉप, मॉडेला चेक नाका – वागळे इस्टेट प्रभाग समिती, रिजन्सी हाईटस आझादनगर, लोढा लक्झेरिया – माजिवडा याठिकाणी गणेश भक्तांना मूर्ती स्विकृती करता येणार आहे. तरी नागरिकांनी ठाणे महानगरपालिकेने उपलब्ध करुन दिलेल्या कृत्रिम तलाव, टाकीमध्ये विसर्जन तसेच मूर्ती स्विकृती केंद्र या ठिकाणी विसर्जन करुन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडून करण्यात आले आहे.

- Advertisment -