घरक्राइमबदलापूरमध्ये तब्बल 15 किलो 900 ग्राम गांजा जप्त

बदलापूरमध्ये तब्बल 15 किलो 900 ग्राम गांजा जप्त

Subscribe

बदलापूर पूर्व पोलिसांची मोठी कारवाई

बदलापूर मध्ये तब्बल 15 किलो 900 ग्राम गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी दोन आरोपीना अटक केली आहे.  अर्जुन देवकर वय (२२)  ऍलिस्टर पीटर वय (२०) या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. १७ फेब्रुवारी रोजी ही कारवाई करण्यात आली. कात्रप परिसरातील मोहन पाम गृह संकुलाकडून सुर्या नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. आरोपी अर्जुन आणि ऍलिस्टर या दोघांकडून पोलिसांनी१,५९००० रुपये किमतीचा १५ किलो ९०० ग्राम गांजा आणि दोन मोबाईल आणि दुचाकी हस्तगत केली आहे.

मागील काही वर्षात बदलापूर शहरात अमली पदार्थांची तस्करी सुरू असल्याचे पाहायला मिळते. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात देखील बदलापूर शहराचे नाव समोर आले होते. याआधी बदलापूर मध्ये २०१८ साली एका कारखान्यातून २०७ किलो गांजा जप्त केला होता. तर २०२१ मध्ये एनसीबी म्हणजे  नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो च्या पथकाने एमडी ड्रग्स आणि ४३ किलो गांजा जप्त केला होता. मागील चार वर्षात बदलापूर शहरात अमली पदार्थ विरोधात मोठ्या कारवाया झाल्या आहेत. १८ फेब्रुवारीला करण्यात आलेली कारवाई बदलापूर पूर्व पोलिसांनी केली आहे. त्यामुळे अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. दरम्यान याबाबत बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांना विचारले असता दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. याप्रकरणी सह पोलीस निरीक्षक एच. एम. कुलकर्णी हे तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -