घरठाणेमागण्या मान्य झाल्याने लाँग मार्चमधील शेतकरी वासिंदमधून परत निघाले

मागण्या मान्य झाल्याने लाँग मार्चमधील शेतकरी वासिंदमधून परत निघाले

Subscribe

विविध मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसांपासून वासिंद येथे थांबलेल्या शेतकर्‍यांच्या लाँग मार्चच्या मागण्या राज्य शासनाने मान्य केल्यानंतर मोर्च्या थांबविण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केले होते. मागण्या मान्य झाल्यासंबंधीचे पत्र जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी शनिवारी स्वतः जाऊन दिल्यानंतर लाँग मार्चमधील शेतकरी मोर्चा थांबवून आपापल्या घरी परत निघून गेले. माजी आमदार जिवा गावित यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांचा लाँग मार्च काढण्यात आला होता. शेतकर्‍यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा करून मागण्या मान्य केल्या. याबरोबरच बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे, सहकार मंत्री अतुल सावे यांनीही शेतकर्‍यांचा शिष्टमंडळासोबत चर्चा केली. शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य झाल्याचे पत्र आज शासनाच्या वतीने जिल्हाधिकारी शिनगारे यांनी दिले.

राज्य शासनाबरोबर शिष्टमंडळाच्या चर्चा होण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाने समन्वय साधला होता. तसेच यासंदर्भात झालेल्या बैठकीचे निर्णय शेतकर्‍यांपर्यंत प्रत्यक्ष पोचविण्याचे काम जिल्हा प्रशासनाने केले. शेतकर्‍यांच्या मागण्यांची अंमलबजावणी सुरू झाल्यामुळे मोर्चातील शेतकरी परत आपापल्या गावी आज निघून गेले. त्यांना सुखरूप आपल्या गावी जाता यावे यासाठी वासिंद रेल्वे स्थानकावरून जाणार्‍या लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देणे, रेल्वेची सोय प्रशासनाच्या वतीने करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -