घरठाणेआशा सेविका मानधनासाठी आंदोलन करणार

आशा सेविका मानधनासाठी आंदोलन करणार

Subscribe

उल्हासनगर महापालिकेच्या अंर्तगत काम करीत असलेल्या आशा सेविका यांना दिवाळीपूर्वी मानधनात वाढ करण्याचे दिलेले आश्वासन महापालिकेने पाळले नसल्याने आशासेविकांमध्ये नाराजी आहे. लवकरात लवकर मानधनात वाढ करण्यात आली नाही तर महापालिके समोर भीख मांगो, आंदोलन करण्याचा इशारा आशा सेविकांनी दिला.
उल्हासनगर महापालिकेत दोनशे आशा सेविका कार्यरत आहेत. कोविड काळात जीव धोक्यात घालून या आशा सेविकांनी दिवस रात्र काम केले होते. आशा सेविका दररोज महापालिकेच्या आरोग्य केंद्रासह प्रत्येक झोपडपट्टीत जाऊन रुग्णांना तसेच गरोदर महिलांना रुग्णालयात दाखल करण्यापासून इतर कामे करतात. दरम्यान महापालिकेच्या प्रत्येक उपक्रमामध्ये या आशा सेविकांचे महत्वपूर्ण योगदान असताना महापालिका त्यांना तुटपुंजे मानधन देऊन त्यांची बोळवण करीत असल्याचा आरोप आशा सेविकांनी केला.
या पूर्वी मानधनात वाढ करण्यात यावी यासाठी आशा सेविकांनी महापालिकेसमोर आंदोलन केले होते. या वेळी त्यांना दिवाळीपूर्वीच त्यांच्या मागण्या मान्य करण्यात येतील असे आश्वासन महापालिकेच्या वतीने देण्यात आले होते. परंतु दिवाळीचा तिसरा दिवस उगवला तरी देखील आशा सेविकांच्या मागण्याचा अद्यापपर्यंत विचार करण्यात आलेला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -