घरठाणेअशोक बुरपुल्ले यांच्याकडे पुन्हा अतिक्रमण विभागाचा पदभार 

अशोक बुरपुल्ले यांच्याकडे पुन्हा अतिक्रमण विभागाचा पदभार 

Subscribe

स्थावर मालमत्ता विभाग मनीष जोशी यांच्याकडे

काही महिन्यांपूर्वीच ठाणे महापालिकेचे उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांच्याकडून अतिक्रमण विभागाचा कार्यभार काढून हा विभाग उपायुक्त अश्विनी वाघमळे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. मात्र वाघमळे यांची बदली झाल्याने हा विभाग आता पुन्हा अशोक बुरपुल्ले यांच्याकडे पालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनी दिला आहे. गुरुवारी पालिका आयुक्तांनी ऑर्डर काढली असून पुन्हा बुरपूल्ले यांच्याकडे अतिक्रमण विभागाचा अतिरिक्त पदभार दिला आहे. तर वाघमळे यांच्याकडेच असलेला स्थावर मालमत्ता विभागाचा अतिरिक्त कार्यभारही उपायुक्त मनीष जोशी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
ठाणे महापालिकेचा अतिक्रमण विभाग आधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात आहे. यापूर्वी उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांच्याकडे अतिक्रमण विभागाचा पदभार देण्यात आला होता. मात्र बुरपुल्ले यांच्याकडून तो पदपार काढून घेऊन त्या जागी शासनाकडून आलेल्या अश्विनी वाघमळे यांच्याकडे त्याची जबाबदारी सोपवली होती. त्यांच्या कार्यकाळात अनधिकृत बांधकामांवर काही प्रमाणात कारवाई देखील सुरु झाली होती.
तर तत्कालीन आयुक्तांच्या कार्यकाळात झालेल्या अनधिकृत बांधकामाचा अहवाल तयार करण्याचे काम देखील त्यांच्याकडे होते. हा अहवाल अंतिम टप्प्यात असताना,त्यांची आता अचानक बदली आली. मात्र बदली झाल्यानंतरही वाघमाळे यांनी त्यांचा अतिक्रमण विभागाचा पदभार सोडला नव्हता. मात्र आता सोमवारी नवीन ऑर्डर कडून अतिक्रमणचा अतिरिक्त पदभार अशोक बुरपुल्ले आणि स्थावर मालमत्ता विभागाचा अतिरिक्त कारभार मनीष जोशी यांना सोपवण्यात आला आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -