घरठाणेठाण्यात MIMच्या कार्यालयावर हल्ला, कार्यकर्ता गंभीर जखमी

ठाण्यात MIMच्या कार्यालयावर हल्ला, कार्यकर्ता गंभीर जखमी

Subscribe

ठाणे – मुंब्रा येथील एमआयएम पक्षाच्या कार्यालयावर आणि कार्यकर्त्यांवर 10 ते 12 अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात एमआयएमचा एक कार्यकर्ता गंभीर जखमी आहे. हल्लेखोरांकडून कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. जखमी कार्यकर्त्याला रुग्णालयात दाखल करण्यात लाले असून अज्ञाविरोधात तक्रार दाखले करण्यात आली आहे.

गुरूवारी रात्री ९ च्या दरम्यान १० ते १२ अज्ञात हातात रॉड, कोयते घेऊन मुंब्य्रातील एमआयएमच्या कार्यालयात घुसले. यावेळी तिथे असलेल्या एका कार्यकर्त्याला जबर मारहाण केली. बिलाल असे हल्ला झालेल्या तरूणाचे नाव असून सय्यद पठाण यांच्यावर हल्ला करण्यासाठी हे गुंड आले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर सय्यद पठाण यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

- Advertisement -

दरम्यान, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून दहा ते बारा अज्ञात हातात रॉड, काठ्या घेऊन कार्यालयामध्ये घुसल्याचे दिसत आहे. त्यानंतर हल्ले खोरांनी कार्यालयात असलेल्या बिलाल या तरूणावर जीवघेणा हल्ला केला. तो या हल्ल्यात जबर जखमी झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिकचा तपास केला जात आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -