घरठाणेबँकेला 24 कोटी रुपयांना फसविण्याचा प्रयत्न

बँकेला 24 कोटी रुपयांना फसविण्याचा प्रयत्न

Subscribe

बोगस चेकद्वारे खातेधारकांचे पैसे उडवणारी टोळी गजाआड

एका कंपनीच्या नावाने बोगस चेक तयार करून बँकेला तब्बल  २४ कोटींचा गंडा घालण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी  बोगस चेकद्वारे खातेधारकांचे पैसे उडवणाऱ्या टोळीतील ७ जणांना गजाआड करण्यात आले आहे.

सचिन प्रकाश साळस्कर (२९, रा. विरार), उमर फारूक (३९, रा. विरार), अनेक अनिल ओतारी (३३, रा. विरार), मजहर मोहम्मद हुसेन खान (40, रा. विरार), हरिश्चंद्र काशिनाथ कडव (रा. वांगणी), नितीन दिलीप शेलार (४९, रा. वांगणी) आणि अशोक बिहारीराम चौधरी (५१, डोंबिवली) अशी या सात जणांची नावे आहेत.
त्यापैकी सचिन साळस्कर, उमर फारूक आणि अनेक ओतारी या तिघांना कल्याण कोर्टाने ६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर उर्वरित चौघांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांची रवानगी कल्याणच्या आधारवाडी तुरूंगात करण्यात आली.

- Advertisement -

बँकेच्या कल्याण-शिळ मार्गावर असलेल्या दावडीतील शाखेचे मॅनेजर विशाल रामप्रसाद व्यास (४५) यांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यातील ७ आरोपींनी इंडस टॉवर प्रा. लि. कंपनीच्या मालकीचा २४ कोटी रुपयांचा बोगस चेक तयार केला. हा चेक बँकेत सादर केला होता. विशेष म्हणजे त्या चेकवर असणाऱ्या सह्या देखील तंतोतंत जुळत असल्याचे बँक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. या गुन्ह्याच्या तपासात गुन्हा उघड करून आतापर्यंत एकूण ७ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या तपासात असेही निष्पन्न झाले की, हे आरोपी टीम वर्कने काम करत होते. यात खातेधारकांचे बँक डिटेल्स गोळा करणे, त्यावर असणारा बॅलन्स, खातेधारकाच्या सहीचे फोटो, वगैरे माहिती घेत असत. त्यानंतर त्या माहितीच्या आधारे बोगस चेक बनवण्याचे काम करत असत. एक साधा चेक घेऊन त्यावरील खातानंबर खोडून, नवीन खातानंबर प्रिंट केला जाई. जमविलेल्या माहितीच्या आधारे मग त्यावर डुप्लिकेट सही केली जात असे. त्यानंतर हा चेक वापरून अकाऊंट टू अकाऊंट पैसे पाठविले जात असत. पैसे ट्रान्सफर करून घेण्यासाठी देखील डमी अकाऊंटचाच वापर केला जात असे. अशाप्रकारे आतापर्यंत या आरोपींनी ५० पेक्षा जास्त बोगस चेक बनविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या सात जणांनी मिळून आतापर्यंत कित्ती कंपन्या, बँका आणि व्यक्तींची अशारितीने फसवणूक केली आहे, याचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -