Video: मनसे पदाधिकाऱ्याला अज्ञात्यांनी भररस्त्यात नेले फरफटत

भर रस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ

Attempt to snatch mobile of mns leader in Ulhasnagar video viral mhas
मनसे पदाधिकाऱ्याला अज्ञात्यांनी भररस्त्यात नेल फरफटत

उल्हासनगरमधील मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गोडसे यांनी अज्ञात दुचाकीस्वारांनी भररस्त्यात फरफटत नेल्याला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा संपूर्ण घटनाक्रम तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सोमवारी रात्री प्रदीप गोडसे उल्हासनगर कॅम्प चारच्या लालचक्की भागातील मित्राशी बोलत असताना ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

प्रदीप गोडसे मनसे आमदार राजू पाटील यांच्याकडील बैठक संपवून सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास लालचक्की येथे आपल्या जनसंपर्क कार्यालयासमोर मित्राशी बोलत उभे होते. याचदरम्यान दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञातांनी गोडसेंच्या गळ्याभोवती फास आवळत रस्त्यावरून फरफटत नेले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे बेसावध असलेल्या गोडसेंना क्षणासाठी काही समजे नाही व ते जमिनीवर कोसळले. यावेळी हल्लेखोरांनी गोडसेंच्या हातावर वार केल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, हा चेन स्नॅचिंगला प्रकार आहे.