HomeठाणेBadalapur : उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरमध्ये २९ ठिकाणी नाकाबंदी

Badalapur : उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरमध्ये २९ ठिकाणी नाकाबंदी

Subscribe

ड्रंक अँड ड्राईव्ह, वाहनांची तपासणी आणि इतर आयपीसी कलमांद्वारे कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उल्हासनगरचे पोलीस उपआयुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे.

बदलापूर । सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई तसेच इतर नागरिकांनी उल्हासनगर आणि अंबरनाथ तालुक्यात असलेल्या हद्दीतील हॉटेल, धाबे ,फार्महाउस,बार अँड रेस्टॉरंट या ठिकाणी वेगवेगळ्या समारंभाचे आयोजन करून ओल्या पार्टीचे नियोजन केले आहे. या काळात मद्यपन करून गाडी चालवणार्‍यांचे घटना मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता असते या पार्श्वभूमीवर उल्हासनगर अंबरनाथ आणि बदलापूर मध्ये एकूण २९ ठिकाणी नाकाबंदी करून १०२ अधिकारी आणि ६२५ कर्मचार्‍यांसह एस आर पी एफ ची टीम तैनात करण्यात आली आहे . यामध्ये ड्रंक अँड ड्राईव्ह, वाहनांची तपासणी आणि इतर आयपीसी कलमांद्वारे कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उल्हासनगरचे पोलीस उपआयुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे.

त्यामुळे आज म्हणजे १ जानेवारी २०२५ रोजी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच उल्हासनगर आणि अंबरनाथ तालुक्यातील विविध भागात असलेल्या मोकळ्या जागांवर, विनापरवाना दारू विकणार्‍या धाब्यांवर ,फार्म हाऊस वर ,अमली पदार्थ सेवन करणार्‍यांवर, ड्रंक अँड ड्राईव्ह करणार्‍यांवर तसेच इतर नियमांचे उल्लंघन करणार्‍यां किती लोकांवर काय कारवाई झाली हे आजच समजेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -