HomeठाणेBadalapur : बदलापूर महापालिका झाल्यावर वामन म्हात्रे महापौर होतील

Badalapur : बदलापूर महापालिका झाल्यावर वामन म्हात्रे महापौर होतील

Subscribe

वनमंत्री गणेश नाईक यांची भविष्यवाणी

बदलापूर । भविष्यात बदलापूर नगर परिषदेची महानगरपालिका झाल्यावर वामन म्हात्रे हे महापौर होतील, अशी भविष्यवाणी वनमंत्री गणेश नाईक यांनी केली. भाजपचे कोकण शिक्षण मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वनमंत्री नाईक शनिवारी बदलापुरात आले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना वनमंत्री नाईक म्हणाले की, जे गुणी जन आहेत त्यांच्या मागे ताकदीने उभे राहणे माझे काम आहे. ज्यांच्यात धमक असते ते कधीही माजी होत नाहीत. कपिल पाटील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, ते जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले, खासदार झाले, केंद्रीय मंत्री सुद्धा झाले. ते पुन्हा खासदार आणि मंत्री होतील असा विश्वासही वनमंत्री नाईक यांनी यावेळी व्यक्त केला.

मुरबाड विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अगोदर पासून बदलापुरात शिवसेना विरुद्ध भाजपचे काही नेते तसेच पक्षांतर्गत असलेले वाद हे राजकीय चष्म्यातून पाहिले जातात. त्यातच भाजपचे वनमंत्री गणेश नाईक यांनी शिवसेनेचे वामन म्हात्रे हे महापौर होतील, अशी भविष्यवाणी जाहीर कार्यक्रमातच केल्याने बदलापूरात राजकीय चर्चांना उधाण आले.
भाजपाचे कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील शाळांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर गुणवंत कर्मचार्‍यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्याचे वन मंत्री गणेश नाईक, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील , आमदार सुलभा गायकवाड तसेच इतर राजकीय सामाजिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.