घरठाणेबदलापूर अग्निशमन दल आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज

बदलापूर अग्निशमन दल आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज

Subscribe

कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने अपुऱ्या मनुष्यबळावर मात सन २००५ व २०१९ च्या पूरपरिस्थितीत कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

कुळगाव बदलापूर नगर परिषदेस अग्निशमन दल आपत्ती व्यवस्थापनसाठी सज्ज असल्याची माहिती फायर ऑफिसर भागवत सोनोने यांनी दिली आहे. नगर परिषद प्रशासनाकडून अग्निशमन दलाला आवश्यक बचाव साहित्य व साधन सामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याशिवाय नुकतेच आपत्कालीन परिस्थिती कशी हाताळावी,साधन सामग्रीचा कशा प्रकारे वापर करावा, याबाबतचा मान्सून पूर्व सरावही झाला आहे. त्यामुळे आता आपत्कालीन परिस्थितीत मदत व बचाव कार्यात कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे अग्निशमन दल सज्ज असल्याचे भागवत सोनोने यांनी स्पष्ट केले. बदलापूर शहरात दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास सखल भाग जलमय होत असतात. अशा परिस्थितीत मदत व बचाव कार्य करण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी गुरुवारी कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे फायर ऑफिसर भागवत सोनोने यांनी बदलापुरातील बॅरेज डॅममध्ये मॉक ड्रिल व मान्सून पूर्व सरावाचे आयोजन केले होते.

कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी, बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक देशमुख, बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता गावडे, नगर परिषद व पोलीस कर्मचारी तसेच पूरग्रस्त भागातील नागरिक व स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक आदींनी यावेळी उपस्थित राहून मॉक ड्रिलमध्ये सहभाग घेतला. फायर ऑफिसर भागवत सोनोने यांच्यासह लिडिंग फायरमन प्रदीप जाधव, अजित गुरव, शैलेश जगताप, विनायक पाटील, महेश कांबळे, रत्नाकर जावळे, विनय ढोक आदींनी पूर परिस्थितीत बचाव व मदत कार्याची प्रात्यक्षिके सादर केली. बदलापुरात पावसाळ्यात निर्माण होत असलेल्या पूर्वपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर फायर ऑफिसर भागवत सोनोने यांनी कुळगाव बदलापूर शहरासाठी जास्तीत जास्त आपत्ती व्यवस्थापन सामग्रीचा प्रस्ताव मुख्याधिकारी दीपक पुजारी यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार मुख्याधिकाऱ्यांनीही तात्काळ नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाला आवश्यक साधन सामग्री उपलब्ध करून दिली असल्याचे सोनोने यांनी सांगितले.

- Advertisement -

उपलब्ध साधनसामग्री
कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाकडे सध्या ४ रबर बोटी, २ फायबर बोटी, ५ इंजिन बोटी असून लवकरच २ स्पीड बोटी अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्याचबरोबर ५० लाईफ जॅकेट, ५० लाईफ रिंग,५० हवेच्या ट्यूब, २ लाइटिंग टॉवर सेट, ५० तरंगणारे स्ट्रेचर, २ जनरेटर सेट,रोप शिडी, पोर्टेबल पम्प, कॉंक्रिट कटर, गेअर ब्रेकर, वेगवेगळ्या प्रकारच्या रस्स्या, गॅस डिटेक्टर, हेवी टॉर्च,ग्राउंड मॉनिटर, एक्स्टेंशन लॅडर,झाडे तोडण्याचे ५ पेट्रोल कटर,४ विद्युत कटर,२० कोयते, १० कुर्हाडी, रेस्क्यू हार्नेस, फायर हुक आदींसह अत्याधुनिक फायर फायटर वाहनही नगर परिषदेच्या ताफ्यात आहे.

पूरपरिस्थितीत कौतुकास्पद कामगिरी
कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने अपुऱ्या मनुष्यबळावर मात सन २००५ व २०१९ च्या पूरपरिस्थितीत कौतुकास्पद कामगिरी केली आहे. सन २०१९ मध्ये बदलापूर वांगणी दरम्यान पुरात अडकलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसमधील प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात अग्निशमन दलाचाही मोलाचा वाटा होता. त्याचवेळी बदलापूर शहराच्या सखल भागात निर्माण झालेल्या पूरस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे कामही अग्निशमन दलाने केले होते. त्यासाठी फायर ऑफिसर भागवत सोनोने व त्यांचे सर्व सहकारी सलग २८ तास मदतकार्यात होते.

- Advertisement -

 

 

 

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -