टेंभीनाक्यावर उद्धव ठाकरेंविरोधात बॅनरबाजी; बाळासाहेबांचा फोटो लावून मविआवर निशाणा

ठाणे – दहीहंडीच्या पंढरीत मानाची समजली जाणाऱ्या ठाण्यातील टेंभीनाक्यावरील दिघे साहेबांच्या आणि मानाच्या हंडीच्या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बॅनरबाजी पाहण्यास मिळत आहे. त्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावण्यात आले आहेत. सहा बॅनर लावून शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. त्यातच टेंभीनाक्यावर पहिल्यांदा पंतप्रधान मोदी, शहा आणि फडणवीस यांचे मोठे फोटो लावण्यात आले आहे. तसेच शहरात लावलेल्या बॅनरवर शिवसेना भाजप युतीची दहीहंडी असेही म्हटले आहे. टेंभी नाक्यावर प्रामुख्याने उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बॅनरबाजी करून राजकीय थर लावल्याचे दिसून आले. (Banner fight against Uddhav Thackeray on Tembhinaka)

हेही वाचा – दहीहंडीनिमित्ताने शिंदे आणि ठाकरे पुन्हा आमने सामने; वर्चस्वाच्या लढाईत कोण जिंकणार?

ठाण्यात सकाळपासूनच दहीहंडीचा उत्साह पहायला मिळतोय. दोन वर्षानंतर हा उत्सव होत असल्याने राजकीय मंडळींनी लाखोंची बक्षिसे लावली आहे. ठाण्यात मानाची समजली जाणाऱ्या टेंभी नाक्यावरील दहीहंडी उत्सवाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. टेंभी नाक्यावरील हा उत्सव आनंद दिघे यांनी सुरू केला होता, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या उत्सवाला विशेष उपस्थिती लागणार असल्याने या उत्सवाकडे लक्ष लागले होते.

असे आहेत बॅनरवरील मजकूर

  • I am a hindu, a mad hindu
  • गर्व से कहो हम हिंदू है …
  • शिवसेनेला जागा कमी पडत असतील तर Ncp सोबत जाणार का? बाळासाहेब Never- Never शुत्र हा शुत्रच असतो.
  • आज जो मानसन्मान हिंदुत्वामुळे आहे, भगव्या झेंड्यामुळे आहे.
  • मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही… कधीच नाही.
  • मतदानाच्यावेळी शिव्या द्यायच्या आणि नंतर त्यांच्याबरोबर आघाडी करायची.