घरठाणेअनधिकृत नळ कनेक्शन धारकांच्या विरोधात अभय योजनेतून 'धन' लाभ

अनधिकृत नळ कनेक्शन धारकांच्या विरोधात अभय योजनेतून ‘धन’ लाभ

Subscribe

 दहा वर्षात २९ कोटी तिजोरीत उत्पन्न जमा

पाणी गळतीबरोबर पाणी चोरीच्या विरोधात ठाणे महापालिकेने चांगली कंबर कसली आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने अभय योजनेचा मार्ग अवलंबल्याने महापालिकेला ‘धन’ लाभ झाला आहेत. तसेच अनाधिकृतपणे पाण्याचा वापर करणाऱ्यांवर अंकुश लावण्यात यश आले. गत वर्षभरात या योजनेतून ९ हजार १९२  अनाधिकृत नळ कनेक्शनला बील लावून त्याच्यातून ५ कोटी ५७ लाख ३५ हजार ५०० रुपयांची धन लक्ष्मी महापालिका तिजोरीत उत्पन्नाच्या स्वरूपात जमा झाली आहे. तर २०११ ते २०२२ या दहा वर्षात अंदाजे २९ कोटी रुपयांचे उत्पन्न पालिकेला मिळाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाण्यातील दिवा, मुंब्रा, कळवा आदींसह इतर भागात अनाधिकृतपणे तसेच चोरीच्या उद्देशाने पाणी कनेक्शन घेतले जात असल्याचे अनेक वेळा निर्दशनास आले आहे. त्यांच्या विरोधात पालिकेने वारंवार कारवाई देखील केली आहे. परंतु कारवाई करुनही पाणी चोरी कमी होत नसल्याचे दिसून आले होते. त्यामुळे पालिकेचे देखील नुकसान होत होते. त्यामुळे अशा घटनांना आळा बसविण्यासाठी अभय योजना राबिवण्याचा निर्णय २०११ मध्ये घेण्यात आला होता. त्याला
महासभेची मान्यता घेत, त्याअनुषंगाने महापालिकेच्या  पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून मागील १० वर्षे ही योजना राबविली जात आहे. दरवर्षी या योजनेअंतर्गत अनाधिकृत नळ संयोजनावर बिल व प्रशासकीय आकारला जात असून त्यानुसार वसुली केली जात असल्याचे पालिकेने सांगितले.

दरम्यान १ एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ पर्यंत ९ हजार १९२ नळ संयोजनावर अभय योजना लागू करण्यात आली आहे. त्यात कळवामध्ये सर्वाधिक ६४९२, त्या खालोखाल मुंब्रा १००२ आणि दिव्यातील ७६६ नळ संयोजनांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisement -

तीन महिने मुदतवाढ, लाभ घेण्याचे आवाहन
अभय योजनेसाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी या योजनेला पुढील तीन महिन्यांसाठी मुदत वाढ दिली आहे. त्यानुसार या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वर्ष – एकूण कनेक्शन – प्रशासकीय कर आणि बिल
२०११-२०१२ – ४७११ – ३,८२,३७,६५०
२०१३-२०१४ – ४७६४ – ३,८२,५७,०३४
२०१४ – ३०२१ – २,५१,९६,५००
२०१५ – १६ – ४११५ – ४,१८,७८,९४०
२०१८-१९ – ४७७८ – २,१६,७३,९५३
२०१९-२० – ५९२७ – ५,५०,८६,२४०
२०२०-२१ – २००७ – १,३४,६८,२५०
२०२१-२०२२ – ९१९२ – ५,५७,३५,५००
——————————
एकूण – ३८५२५ – २८,९५,३४,०६७

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -