घरठाणेभारत जोडो यात्रेला यश मिळणार नाही- केंद्रीय मंत्री नारायण राणे

भारत जोडो यात्रेला यश मिळणार नाही- केंद्रीय मंत्री नारायण राणे

Subscribe

माजी महापौर कै. शाहू सावंत यांचे सुपुत्र डॉ. सर्वेश सावंत यांच्या नवीन रुग्णालयाचे उद्घाटन

शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस हे सगळे पक्ष भारत जोडो मध्ये आहेत. त्यांची अजून मने जुळली नाहीत तरी ते सत्तेसाठी एकत्र येतात. इतकी वर्षे देशात कॉंग्रेसची सत्ता होती, मात्र तेव्हा राहुल गांधी यांना भारत जोडो यात्रा काढावी असे वाटले नाही. या यात्रेत तीच तीच लोकं दिसतात, नवीन लोकं जोडली जात नाहीत. त्यामुळे त्यांच्या भारत जोडो यात्रेला यश मिळणार नाही, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी डोंबिवलीत केले.

माजी महापौर कै. शाहू सावंत यांचे सुपुत्र डॉ. सर्वेश सावंत यांच्या नवीन रुग्णालयाचे उद्घाटन कार्यक्रमासाठी नारायण राणे डोंबिवलीत आले होते. त्यावेळी पत्रकारांनी आदित्य ठाकरे हे भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. त्याबाबत विचारले असता राणे म्हणाले, मी आदित्य ठाकरे यांच्याबाबत बोलत नाही. ते फार बालिश आहेत. कधी कोणाला भेटायला जाईल, सांगता येत नाही, सावरकर यांचे देशासाठी मोठं योगदान आहे. आदित्य ठाकरे यांना सावरकरांच्या बाबत काहीही गंधही नाही. भारत जोडो यात्रेत गेल्यावर फोटो येईल, यासाठी ते गेले होते .सावरकरांच्या बाबत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याची त्यांना चीड आली नाही, अशी टीका राणे यांनी केली.

- Advertisement -

महाराष्ट्राच्या राजकारणात बदल्याची भाषा पहिल्यांदाच ऐकते. असे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. त्याबाबत विचारले असता राणे म्हणाले कि, पहिले देखील बदले घेतले जायचे, मात्र ते गुपचूप बदले घेतले जायचे असे कोणी दाखवले जायचे नाहीत. बुखारींपासून अशी अनेक नावे आहेत. यावेळी मुंबई – गोवा रस्त्याचे काम रखडले आहे. खड्ड्यांमुळे प्रवास जीवघेणा झाला आहे. याबाबत विचारले असता राणे म्हणाले कि कंत्राटदार पळाला आहे. त्याच्या जागी नवीन कंत्राटदार नेमण्याचे काम सुरु आहे. केंद्रीय मंत्री व राज्यातील सार्वजनिक बांधकाम मंत्री हे सक्षम आहेत. लवकरच या रस्त्याचे काम पूर्ण होईल, असा दावा राणे यांनी केला आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण देखील उपस्थित होते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -