घरठाणेभावली पाणी योजना करणार शहापूरला टँकरमुक्त !

भावली पाणी योजना करणार शहापूरला टँकरमुक्त !

Subscribe

पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या टंचाई ग्रस्त भागातील पाणी टंचाई कायम स्वरुपी सुटणार

दरवर्षी उन्हाळ्यात शहापूर तालुक्यातील गाव पाड्यांवर पाणी टंचाईचे तडाखे लोकांना सहन करावे लागत आहेत पाण्यासाठी दाहीदिशा आदिवासी महिलांना वणवण करावी लागते आहे. दरवर्षी उन्हाळ्यात विहिरी आटल्या की पाण्याची बोंबाबोंब सुरु होते. मग पाण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागतो. दुसरीकडे सरकारचा या टँकरवर वारेमाप पैसा खर्च होतो आहे. टँकरने पाणी पुरवठा करणे हा एकमेव कायमस्वरुपी पाणी टंचाईवर उपाय नसून एखादी पाणी योजनाच शहापूर तालुक्यासाठी अस्तित्वात येणं गरजेचं आहे. आणि त्या दिशेने आता सरकारची पाऊले पडताना दिसत आहेत.

भावली योजना मंजूर होण्यासाठी शहापूर विधानसभेचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी सरकारकडे खास प्रयत्न केले योजनेसाठी त्यांनी मंत्रालय स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला आणि भावली पाणी पुरवठा योजना सरकारकडून मंजूर करुन घेतली या योजनेचा मोठा आधार टंचाई ग्रस्त भागातील गाव पाड्यांना होणार आहे. पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या टंचाई ग्रस्त भागातील लोकांची पाणी टंचाई कायम स्वरुपी सुटणार आहे. आता एकमेव भावली धरण पाणी योजनेची सर्वांना प्रतिक्षा असून वर्षानुवर्षे पाणी टंचाईचे चटके सहन करणाऱ्या गाव पाड्यांची मदार भावली पाणी योजनेवर दिसते आहे.भावली योजनेसाठी बरोरा हे २०१४ पासून सरकारकडे आग्रही होते अखेर त्यांना याकामी यश आले असून भावली पाणी पुरवठा योजनेस ठाकरे सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे.

- Advertisement -

यामुळे भावली पाणी पुरवठा योजना प्रत्यक्षात साकार होणार आहे. गेल्या वर्षानुवर्षे पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या शहापूर तालुक्याला नाशिक जिल्ह्यातील इगतपूरी तालुक्यात असणाऱ्या भावली धरणातून ग्रीड व गुरुत्वाकर्षण पद्धतीने पाणी खेचून ही महत्वाकांक्षी पाणीयोजना सरकारकडून राबवली जाणार आहे. २०१४ ला शहापूर विधानसभेचे आमदार झाल्यानंतर पांडूरंग बरोरा यांनी नाशिकमधील भावली धरणातून कमी खर्चात शहापूरच्या पठारांवरील ९७ आदिवासी गावे व २५९ पाड्यांना गुरुत्वाकर्षण पद्धतीने पाणीपुरवठा करण्यासाठी ही महत्वाकांक्षी योजना सरकारपुढे ठेवली होती.

या योजनेचे महत्त्व त्यांनी सरकारला पटवून दिले आणि योजनेसाठी सर्वेक्षण झाल्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ठाणे यांच्या पत्रान्वये तांत्रिक मान्यता प्रदान करण्यात आली होती. तसेच जलसंपदा विभागाने २३ मार्च २०१८ रोजी या योजनेसाठी भावली धरणातील पाणी आरक्षणास मंजूरी दिली होती. त्यानुषंगाने पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत ४ फेब्रुवारी २०२० रोजी भावली योजनेस मान्यता प्राप्त झाली होती. २०१९-२०च्या प्रचलित दरानुसार या योजनेसाठी २७६ कोटी ४१ लाख ५४ हजार रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

- Advertisement -

मार्च २०२४ पर्यंत ही योजना पूर्ण करण्याचा संकल्प आहे. बहुतांश कसारा व खर्डी जवळील दुर्गम डोंगर व पठार भागातील लोकांना या योजनेचा विशेष फायदा होणार आहे. स्थानिक लोकांच्या पाण्याचा अग्रक्रमाने विचार होणं गरजेचं आहे. त्या दिशेनेने सरकार संवेदनशील झालं आहे. ठाकरे सरकारने २७६ कोटींच्या भावली पाणीपुरवठा योजनेची निविदा देखील काढल्याने शहापूर तालुक्यात उत्साहाचे वातावरण आहे. वर्षानुवर्षे पिण्याच्या पाण्यासाठी आपले हाल सहन करुन आपलं योगदान शहरातील लोकांसाठी देणाऱ्या तालुक्यात जर भावली योजनेचं पाणी मिळालं तर हा तालुका टँकर मुक्त होईल. योजनेचे खरे शिलेदार ठरले आहेत पांडुरंग बरोरा, पण यासाठी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे स्थानिक जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करून माझे भावली योजनेचे स्वप्न साकार होत आहे. गेले आणि ५ वर्षांची मेहनत सफल झाली आता लवकरच तालुक्यातील सर्व गाव पाड्याची पाणी टंचाई दूर होणार असल्याने समाधान वाटते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे शब्द टाकला असता त्यांनी दिलेला शब्द प्रत्यक्षात उतरवल्याने आनंद झाला आहे. अशा भावना माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी व्यक्त केल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -