Homeक्राइमBhiwandi News : साखर झोपेत असलेल्या पती-पत्नीला जाळण्याचा प्रयत्न, भिवंडीत खळबळ

Bhiwandi News : साखर झोपेत असलेल्या पती-पत्नीला जाळण्याचा प्रयत्न, भिवंडीत खळबळ

Subscribe

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात पहाटे साखर झोपेत असलेल्या एका दाम्पत्याला जीवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भिवंडीतील निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुरेशीनगर भागामध्ये ही धक्कादायक घटना घडली.

ठाणे : जिल्ह्यातील भिवंडी शहरात एका धक्कादायक घटनेमुळे खळबळ उडाली. पहाटे साखर झोपेत असलेल्या एका दाम्पत्याला जीवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भिवंडीतील निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुरेशीनगर भागामध्ये ही धक्कादायक घटना घडली. या घटनेत पती-पत्नी जखमी झाले आहेत. आसिफ कुरेशी आणि फरीन कुरेशी असे या दाम्पत्याचे नाव असून या प्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. शनिवारी (ता. 28 डिसेंबर) पहाटे ही घटना घडली असल्याचे सांगण्यात आले आहे. (Bhiwandi News an attempt was made to burn sleeping husband and wife)

मिळालेल्या माहितीनुसार, आसिफ कुरेशी आणि फरीन कुरेशी हे पती-पत्नी दोघे घरात झोपले होते. यावेळी पहाटे 3 ते 3.30 वाजताच्या दरम्यान अज्ञात व्यक्ती घराच्या दरवाज्यावर पेट्रोल टाकून आग लावून फरार झाला. यावेळी हल्लेखोराने घराच्या मागील दरवाजाला बाहेरुन कडी लावली होती. आगीने पेट घेत घरात धूर जमा झाल्याने आणि श्वसनास त्रास होऊ लागल्याने झोपेत असलेले दोघेही पती-पत्नी जागे झाले. त्यांनी लगेच आरडाओरड केली. त्यांनी दुसऱ्या दरवाजाने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, परंतु तो दरवाजा बाहेरुन बंद असल्याने दोघांनाही घराबाहेर पडता आले नाही. यानंतर दोघांनीही आरडाओरड केल्याने शेजारी जागे होऊन घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तत्काळ ही आग विझवली.

हेही वाचा… Santosh Deshmukh Murder : मातीआड गेलेले माझे वडील…, बीडमधील मोर्चात वैभवीची भावनिक साद

परंतु, घरात लागलेली आग विझवताना कुरेशी दाम्पत्य जखमी झाले आहे. स्थानिकांनी आगीतून बाहेर काढत या दोघांचाही जीव वाचवला. त्यानंतर जखमी कुरेशी दाम्पत्याला नागरिकांनी उपचारासाठी भिवंडीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले. या घनटनेनंतर निजामपूर पोलीस आणि फॉरेन्सिक टीम दाखल झाली. या परिसरात मादक पदार्थ विक्री करून गुंडगिरी करणारे तौकिर व त्याच्या साथीदारांनी ही आग लावल्याचे बोलले जात आहे. कारण, तीन महिन्यापूर्वी तौकिर व त्याच्या साथीदारांनी आसिफ याचा मेहुणा अनस व त्याच्या कुटुंबीयांना मारहाण केली होती. या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण हा गुन्हा मागे घे नाहीतर संपवून टाकू अशी धमकी आरोपींनी दिली होती. ज्यानंतर कुरेशी दाम्पत्यावर हा जीवघेणा हल्ला करण्यात आला. मात्र, या घटनेनंतर आता आरोपींना शिक्षा व्हावी, अशी मागणी जखमी झालेल्या कुरेशी दाम्पत्याने केली आहे.


Edited By Poonam Khadtale