घरठाणेओवळा-माजिवडा मतदारसंघात ३ तरण तलावाचे भूमीपूजन

ओवळा-माजिवडा मतदारसंघात ३ तरण तलावाचे भूमीपूजन

Subscribe

आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांना यश

ठाणे । छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ओवळा-माजिवडा मतदारसंघातील ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत आमदार प्रताप सरनाईक याच्या संकल्पनेतून आणि विशेष निधीतून मंगळवारी तीन ठिकाणी तरण तलावांचे भूमिपूजन सोहळा पार पडला. ठाणे शहरामध्ये फक्त कळवा, कोपरी व वर्तकनगर या भागामध्येच नागरिकांच्या सोयीसाठी ऑलम्पिक साईज जलतरण तलाव (स्विमिंग पूल) आणि त्याचठिकाणी आधुनिक जिम बांधण्यात आलेले आहेत. ठाणे शहरात सर्वसामान्य, मध्यमवर्गीय, गरीब असे सर्व समावेशक समाजघटक राहत आहेत. ठाणे शहराची वाटचाल स्मार्ट सिटी म्हणून ओळखण्याकडे होत आहे. शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी शहराच्या इतर भागात नागरिकांना त्यांच्या जवळच आपापल्या भागात सरकारचे स्विमिंग पूल असावेत, अशी आमदार प्रताप सरनाईक यांची संकल्पना आहे.

त्यानुसार कॉसमॉस- होरायझोन लगत असलेल्या सुविधा भूखंडावर, बेथनी हॉस्पिटलच्या मागील बाजूस, ठाणे. वाघबीळ गाव, रेतीबंदर रोड, ठाणे. प्लॅटिनम चौक, रोझा गार्डनीय हॉस्पिटल समोर, कासारवडवली, घोडबंदर रोड, ठाणे. या तीन ठिकाणी आमदार प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला. या ठिकाणी जलतरण तलाव (स्विमिंग पूल) व त्याचठिकाणी जिम बांधण्यात येणार असून त्या ठिकाणी स्वागत कक्ष, चेंजिग रूम, शौचालय, स्टोअर रूम व फिल्ट्रेशन प्लांट बनविण्यात येणार आहे. ठाणे शहरामध्ये महापालिका क्षेत्राची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून येथील विद्यार्थी, तरुण, नागरिक यांच्यासाठी ठाणे शहरातील घोडबंदर रोड येथे जलतरण तलाव (स्विमिंग पूल) व त्याचठिकाणी आधुनिक जिम बांधण्यात याव्यात अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती व त्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. घोडबंदर रोड येथे स्विमिंग पूल बांधण्यासाठी शासन निर्णय प्रसिद्ध झाला असून प्रत्येकी 10 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. याप्रसंगी महिलाओवळा-माजिवडा विधानसभा प्रमुख, माजी नगरसेविका परिषा सरनाईक, साधना जोशी, नम्रता घरत, कल्पना पाटील, जयश्री डेव्हिड, राधिका फाटक, ओवळा-माजिवडा विधानसभा प्रमुख राजेंद्र फाटक, विधानसभा सचिव संदीप डोंगरे आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -