घरठाणेभिवंडीतील कोनगाव हद्दीत बाईक सर्विस सेंटरला भीषण आग

भिवंडीतील कोनगाव हद्दीत बाईक सर्विस सेंटरला भीषण आग

Subscribe

या आगीत संपूर्ण सर्विस सेंटर जळून खाक

भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथे असलेल्या मोटर बाईक सर्विस सेंटरला मध्यरात्री अचानक भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण सर्विस सेंटर जळून खाक झाले आहे. आगीचं कारण शॉर्टसर्किट असल्याचे सांगितले जात आहे. आग लागल्याचे समजताच स्थानिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

- Advertisement -

दरम्यान आग मोठी असल्याने या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाला देखील घटनास्थळी बोलावण्यात आले. या आगीत संपूर्ण सर्विस सेंटर जळून खाक झाले आहे . मोहम्मद अस्लम असे सर्विस सेंटर मालकाचे नाव असून या आगीमुळे त्यांचे लाखोंचे नुकसान झाले असल्याची माहिती मिळतेय.

आगीची सूचना मिळताच भिवंडी अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी तात्काळ दाखल झाली व अग्निशमन दलाच्या जवानांनी एका तासाच्या प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश मिळालं.


ST महामंडळाला १ हजार कोटी देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -