घरठाणेकल्याण-डोंबिवली भाजपाला खिंडार

कल्याण-डोंबिवली भाजपाला खिंडार

Subscribe

नगरसेवक फुटीच्या उंबरठ्यावर

कल्याण-डोंबिवली पालिकेतील डोंबिवलीतील तुकाराम नगर प्रभागाचे भाजप नगरसेवक नितीन पाटील हे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत डोंबिवलीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत.यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेविका पत्नी रंजना नितीन पाटील. काँग्रेसचे ज्येष्ठ माजी नगरसेवक रवी मट्या पाटील हे ही शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. या हालचालींमुळे भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडाला फुटीरते मुळे सुरुंग लागला आहे.

रवी पाटील आणि नितीन पाटील यांनी आतापर्यंत डोंबिवली पूर्वेतील आयरे गाव व तुकाराम नगर प्रभागांचे नेतृत्व केले आहे. आगामी होऊ घातलेल्या कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निवडणुकीत नवीन प्रभाग रचनेमध्ये भाजपच्या बहुतांशी प्रस्थापित नगरसेवकांचे प्रभाग रद्द. त्यांची मोडतोड ते अन्य प्रभागांना जोडण्यात आले आहेत. त्यामुळे भाजप नगरसेवकांमध्ये. इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. येत्या पालिका निवडणुकीत आपणास उमेदवारी मिळेल की नाही याची शाश्वती नसल्याने भाजपमधील माजी नगरसेवक. इच्छुकांनी शिवसेनेची वाट धरली आहे.

- Advertisement -

गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत डोंबिवलीत वरील शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांची एकूण संख्या आता आठ झाली आहे. भाजपला गळती लागू नये स्थानिक आमदार. पदाधिकारी नाराज. इच्छुक. प्रस्तापित नगरसेवकांच्या बैठका घेत नसल्याने भाजपमध्ये नाराजीचा सूर आहे. भाजपमध्ये सध्या नाराज गटात माजी नगरसेवक शैलेश धात्रक. मनीषा धात्रक. श्रीकर चौधरी. प्रमिला चौधरी. राणजीत जोशी यांचाही समावेश आहे.

भाजपच्या अनेक नगरसेवकांनी खासदार. वरिष्ठ पदाधिकार्‍यांच्या भेटी घेऊन मला आगामी निवडणुकीत उमेदवारी मिळेल की नाही ते स्पष्ट सांगा. अन्यथा आमचा मार्ग मोकळा करा असे सांगण्यास सुरुवात केली असल्याचे कळते. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे गुरुवारी संध्याकाळी पालिका हद्दीतील विकास कामांचा शुभारंभ आणि संध्याकाळी साडेसहा वाजता डोंबिवली शिवसेना शहराध्यक्ष राजेश मोरे यांच्या मुलीच्या शाही विवाह सोहळ्यला उपस्थित राहणार आहेत. यावेळी भाजपमधील इतर अस्वस्थ शिवसेनेत दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे .

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -