Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर ठाणे कल्याणमध्ये भाजप जिल्हा उपाध्यक्षांच्या कार्यालयावर दगडफेक

कल्याणमध्ये भाजप जिल्हा उपाध्यक्षांच्या कार्यालयावर दगडफेक

Subscribe

कल्याण पश्चिमेतील वालधुनी भागातील कल्याण जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष संदीप सिंग यांच्या जनसंपर्क कार्यालयावर गुरुवारी रात्री काही अनोळखी व्यक्तींनी दगडफेक केली. या दगडफेकीत कार्यालयाबरोबर जवळच असलेल्या त्यांच्या वाहनाचे नुकसान झाले आहे. उपाध्यक्ष सिंग यांनी याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. सिंग यांना यापूर्वीपासून काही मंडळी त्रास देत आहेत. त्यामधून हा प्रकार घडला असण्याचा संशय कल्याण जिल्हा भाजपचे अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी व्यक्त केला. ‘वालधुनी भागात अनेक वर्ष सामाजिक कार्याबरोबर राजकीय काम करतो. आपले या भागातील सर्वांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे घडला प्रकार दुर्देवी आहे, असे उपाध्यक्ष सिंग यांनी सांगितले.

सिंग हे कुटुंबासह दोन दिवस बाहेरगावी होते. या कालावधीत त्यांच्या वालधुनी भागातील जनसंपर्क कार्यालयावर दोन ते तीन अनोळखी व्यक्तिंनी दगडफेक केली. या दगडफेकीत कार्यालया बरोबर जवळच उभ्या करुन ठेवलेल्या त्यांच्या मोटारीवर दगड पडल्याने वाहनाचे नुकसान झाले. दगडफेकीचा प्रकार कार्यालया बाहेरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. ही माहिती मिळताच भाजपचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी घटनास्थळी जाऊन सिंग यांची भेट घेतली. घडला प्रकार समजून घेतला. हा प्रकार पूर्ववैमनस्य की राजकीय वैमनस्यातून घडला आहे. यामागचा सूत्रधार कोण याचा तपास पोलीस करत आहेत. एक वरिष्ठ पोलीस सुत्राने सांगितले, सीसीटीव्हीतील चित्रणाप्रमाणे आरोपींची ओळख पटविण्यात आली आहे. त्यांचा शोध सुरू आहे.

- Advertisement -

उपाध्यक्ष संदीप सिंग हे पक्षाचे तळमळीचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या कार्यालयावर दगडफेक झाल्याची माहिती कळताच आपण पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांची भेट घेऊन दगडफेक करणार्‍यांना अटक करण्याची मागणी केली आहे.
-शशिकांत कांबळे, जिल्हाध्यक्ष, कल्याण जिल्हा भाजपा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -